Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

‘त्या’ चिमुरड्याच्या भेटीसाठी महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांची रुग्णालयात धाव; भोंदूबाबावर पोलिस कारवाई करण्याचे दिले आदेश

ताप आल्यानंतर पोटफुगीवर उपचार म्हणून ३ वर्षीय चिमुकल्याच्या पोटावर गरम विळ्याचे चटके दिल्याचा संतापजनक प्रकार.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अशिक्षितपणा व अंधश्रद्धेच्या विळख्यात जखडलेला अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील आदिवासी समाज निरागस बालकांवर वैद्यकिय उपचारा ऐवजी डम्मा (पोटावर लोखंडी सळाखी गरम करुन चटके देणे) देत आहे, ३ वर्षीय बालकाच्या पोटाला चटके दिल्याने खळबळ उडाली आहे.

अमरावती : एका ३ वर्षीय कोवळ्या बालकास मांत्रिकाने चटके (डांगण्या) दिल्या होत्या, त्यांच्या प्रकृतीत काहीही सुधारणा झाली नसून तो जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात मृत्यूशी झुंज देत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी रुग्णालयात जाऊन बालकांच्या प्रकृतीची विचारपूस करत आई-वडिलांची भेट घेतली. सध्या बाळाची प्रकृती स्थिर असुन बाळाकडे विशेष लक्ष देण्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांना निर्देश दिले.  भोंदूबाबावर पोलिस कारवाई करण्याचे आदेश यशोमती ठाकूर यांनी यावेळी आरोग्य विभागाला दिले.

तसेच यासारखे प्रकार पुन्हा  घडू नये यासाठी आदिवासी बांधवांचे समुपदेशन करुन त्यांना अंधश्रद्धेतुन बाहेर काढावे असे आवाहनही यावेळी केले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

चिखलदरा तालुक्यातील खटकाली येथील राजरत्न जामुनकर हा ३ वर्षीय बालक आठवडाभरापासुन आजारी होता. त्याच्या घरच्याने त्याला भोंदूबाबाकडे नेत भोंदूबाबाने कोवळ्या निरागस बालकाच्या पोटावर डम्मा, डांगण्या देवुन पोटाची चाळणी केली. बालकावर जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

हे देखील वाचा :

धक्कादायक!! पोलीस निरीक्षकानेच केला महिला पोलीस शिपायावर अत्याचार!

अहेरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर अ‍ॅक्टीव मोडवर

सुरजागड प्रकल्पाच्या कामावर जाल तर जीवाला मुकाल; नक्षल्यांची पत्रके टाकून मजुरांना धमकी

 

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.