Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अनाधिकृत प्रयोगशाळा (लॅब) चालकांवर कारवाई करा : संतोष ताटीकोंडावार यांची निवेदनातून मागणी

अहेरी, आलापल्ली शहरात शासनाची मान्यता नसतांना थाटले आहेत प्रयोगशाळा. जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडून चौकशीअंती कारवाई करण्याची मागणी.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अहेरी शहराला राजनगरी म्हणून विशेष ओळख आहे. एव्हढेच नव्हे तर अहेरी उपविभागातील अहेरी, आलापल्ली शहरात प्रमुख कार्यालये, रुग्नालय, बाजारपेठ तसेच दळणवळणाचे मुख्य केंद्रबिंदू आहे. सध्या देशभरात कोरोनाने थैमान घातले असल्याने जनमाणसात संसर्गाची भीती निर्माण झाली आहे.

थोडही अस्वस्थता वाटले तरी शहरातील छोट्या मोठ्या डॉक्टरकडे धाव घेऊन उपचार करीत असतात. अशातच संबंधित डॉक्टरकडून तपासणी करून लक्षणे ओळखून विविध आरोग्यासंबंधित नमुन्याची तपासणी करण्यासाठी त्यांच्या अधिनस्त असलेल्या (खाजगी) प्रयोगशाळेत पाठवीत असतात.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गडचिरोली : अहेरी, आलापल्ली शहरात अनेक अनाधिकृत प्रयोगशाळा (लॅब) चालक नमुने घेत असून त्यांना सुगीचे दिवस आले आहे. वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञानाचा परवाना नसतांनाही बेकायदेशिररित्या प्रयोगशाळा (लॅब) टाकून कोरोना काळात गरीब रुग्णांची लूट सुरु असल्याने शहरातील अशा अनाधिकृत लॅब चालकांचा शोध घेऊन दस्ताऐवज तपासअंती दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जनकल्याण समाजोन्नती अन्याय भ्रष्टाचार निवारण समितीचे जिल्हाध्यक्ष संतोष ताटीकोंडावार यांनी तहसिलदार अहेरी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

महाराष्ट्र पॅरावैद्यकीय परिषद अधिनयम 2011 कलम 31 पोटकलम 1 मध्ये वर्णन केलेल्या अधिनयमानुसार ज्या प्रयोगशाळांची नोंद राज्य शासनाच्या नोंदवहित नाही अशा बेकायदेशील प्रयोगशाळांना हा व्यवसाय करण्याची परवानगी नाही. मात्र असे असतांनाही अहेरी, आलापल्ली शहरात काही सुशिक्षितांनी संधी साधून प्रयोगशाळा (लॅब) उघडले असून सदर चालकांकडे अधिकृत वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञचा परवाना नसतांना परिसरात ठाण मांडून लुट करीत आहेत.

सद्यस्थितीत कोरोना महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढत आहे. अशास्थितीत रुग्णांकडून या अनाधिकृत लॅब चालकांकडून अक्षरश: लूटालूट चालविली जात आहे. त्यामुळे अनाधिकृत लॅबचा प्रश्न अधिक गंभीर वळण घेत आहे.

त्यामुळे सर्वसामान्य जनतेला न्याय देत शहरात बेकायदेशिर व्यवसाय थाटून रुग्णांची लूट करणा-या लॅब चालकांच्या दस्ताऐवजाची तपासणी करुन दोषी आढळणा-यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी संतोष ताटीकोंडावार यांनी तहसिलदार यांचेमार्फत जिल्हाधिका-यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.

हे देखील वाचा :

अहेरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर अ‍ॅक्टीव मोडवर

धक्कादायक!! पोलीस निरीक्षकानेच केला महिला पोलीस शिपायावर अत्याचार!

सुरजागड प्रकल्पाच्या कामावर जाल तर जीवाला मुकाल; नक्षल्यांची पत्रके टाकून मजुरांना धमकी

 

Comments are closed.