Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

रोजगाराच्या मागणीप्रमाणे तरुणांना प्रशिक्षित करावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:  

मुंबई, दि. 25 नोव्हेंबर: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक तरुणाचे रोजगार गेले आहेत. आता या पार्श्वभूमीवर नव्याने रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत त्याप्रमाणे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाने नवीन मागणीप्रमाणे तरुणांना प्रशिक्षित तयार करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

वर्षा निवासस्थानी आज कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सादरीकरण झाले त्यावेळी श्री ठाकरे बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय महेता, अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या सचिव अंशु सिन्हा, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्त दिपेद्रसिंह कुशवाह उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.