Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

‘हिंमत असेल तर चिनी सैन्यावर सर्जिकल स्ट्राईक करा’-ओवेसीं

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

हैदराबाद डेस्क २५ नोव्हेंबर :- एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान मोदी यांना चिनी सैन्यावर सर्जिकल स्ट्राईक करण्याचं आव्हान दिलं आहे. ओवेसी यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ओवेसी भाषण करताना दिसत आहेत. या भाषणात त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

“भाजपने निवडणूक जिंकल्यानंतर हैदराबादमध्ये सर्जिकल स्ट्राईक करु, असं वचन दिलं आहे. भाजप लडाखमध्ये अशी बहादुरी का दाखवत नाही, जिथे चिनी सैन्यांनी भारताच्या भूमीवर ताबा घेतला आहे”, असं ट्विटमध्ये ओवेसी म्हणाले आहेत.

“तुम्ही सर्जिकल स्ट्राईक करा, आम्ही तुमचं कौतुक करु. चिनी फौजेला उखाडून फेका. पण तिथे सर्जिकल स्ट्राईक करणार नाहीत. तुमचा एक नेता ओल्ड सिटीवर सर्जिकल स्ट्राईक करण्याची भाषा करतो. तुम्ही खरंच शहरावर सर्जिकल स्ट्राईक करणार, तुम्ही शहरासाठी केलं तरी काय?”, असादेखील सवाल ओवेसी यांनी केला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.