Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कोरोना काळात संविधान प्रास्ताविकतेचे वाचन घरूनच करावे.

संविधानच भारतीयांसाठी प्राणवायू आहे
सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अलोने यांचे आवाहन.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अहेरी २५ नोव्हेंबर:- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारताचे संविधान सुपूर्द करण्यात आले त्यामुळे संपूर्ण देशात संविधान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी भारतीय राज्यघटना देशाला समर्पित करण्यात आली होती. हा दिवस राष्ट्रीय उत्सवाप्रमाणे साजरा करण्यात येतो, या दिवशी संपूर्ण देशात भारतीय राज्य घटनेचे वाचन करण्यात येऊन संविधानप्रती निष्ठा व्यक्त करण्यात येते. शिवाय याच दिवशी मुंबई येथील हल्ल्यात वरिष्ठ पोलिस अधिकारी, कर्मचारी व नागरिक शहीद झाले होते. या शहिदांना संपूर्ण देशात भावपूर्ण आदरांजली वाहण्यात येत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

देशात कोविड-१९ साथरोगाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता जिल्हयातील नागरिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपण ज्या ठिकाणी आहात त्याच ठिकाणाहून घरून संविधानाचे वाचन आणि  अभिवादन करावे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक परिश्रम घेऊन २ वर्षे ११ महिने १८ दिवसात भारतीय संविधान तयार करून २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाला अर्पित केले असून भारतीय संविधान हा भारताचा सर्वोच्च कायदा व पायाभूत कायदा (legal basis) असून संविधान म्हणजेच एकप्रकारे प्राणवायु आहे, त्यामुळे सर्वांनी संविधान प्रास्ताविकतेचे वाचन घरून करण्याचे आवाहन सुरेंद्र अलोने यांनी केले आहे.

Comments are closed.