Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी विस्तारीत रुग्णालय सक्षम – पालकमंत्री दादाजी भूसे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:  

पालघर, दि. 25 नोव्हेंबर: वसई व परीसरातील नागरीकांना 1860 पासुन हे रुग्णालय सेवा देत असून या इमारतीचे नुतनीकरण करण्यात येणार असून हे रुग्णालय आरोग्याच्या कोणत्याही समस्यांशी लढण्यासाठी सक्षम असल्याचे . पालकमंत्री दादाजी भूसे यांनी सांगितले.
यावेळी जि. प. अध्यक्षा भारती कामडी, माविम अध्याक्षा ज्योती ठाकरे, खासदार राजेंद्र गावित, सर्वश्री आमदार रविंद्र फाटक, क्षितिज ठाकूर, श्रीनिवास वनगा, माजी महापौर प्रविण शेट्टी, जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, वसई-विरार महानगरपालिका आयुक्त गंगाथरन. डी तसेच शासकिय अधिकारी व नागरिक उपस्थित होते.

कोरोना महासंकटाच्या काळात वैद्यकिय क्षेत्राने उल्लेखनिय काम केले आहे. या ईमारतीच्या नुतनीकरण केल्याने 100 खाटांचे रूग्णालय जिल्ह्यासाठी उपयोगाचे ठरणार असल्याचे. पालकमंत्री दादाजी भूसे यांनी सांगितले . नागरिकांनी कोरोनाला दुर ठेवण्यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी या योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या जनजागृती नुसार प्रबोधन केलेल्या बाबींचे काटेकोरपणे पालन करावे असे पालकमंत्री श्री. भूसे यांनी सांगितले.
पालघर जिल्ह्याची सिमा गुजरात राज्याला लागून असल्याने जिल्ह्यातील सिमा भागातील प्रवेश द्वारावर दहा टिम तयार करण्यात आल्या आहेत. या दहा टीम च्या माध्यमातून चेक पोस्टवर राज्यात येणाऱ्या नागरिकांची तपासणी करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री दादाजी भूसे यांनी सांगितले. वसई व परिसरातील कोरोना रुग्णांवर उपचार करणारे कोरोना योद्धा डॉ.हेमंत पाटील यांना पालकमंत्री श्री भुसे यांनी श्रध्दांजली वाहीली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.