अर्णब गोस्वामी यांना जामीन मंजूर.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली डेस्क ११ नोव्हे : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. अर्णब गोस्वामी आणि अन्य दोन आरोपींची अंतरिम जामिनावर सुटका करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. अर्णब गोस्वामी यांना दिलासा नाकारताना मुंबई उच्च न्यायालयाकडून चूक झाली असल्याचंही सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी (9 नोव्हेंबर) अर्णब गोस्वामी यांना तातडीचा दिलासा देण्यास नकार दिल्याने त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं. त्यावर न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्यासमोर सुनावणी झाली.
Comments are closed.