Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

विदर्भात पेट्रोकेमिकल्स व रिफायनरी कॉम्प्लेक्स उभारून युवकांसाठी रोजगार निर्मिती करा – खा. अशोक नेते

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, दि. २२ डिसेंबर :  महाराष्ट्रातील विदर्भ क्षेत्र हा देशातील सर्वात मागासलेला क्षेत्र आहे. येथे उद्योग व प्रकल्पांची कमतरता असल्यामुळे येथील शेकडो बेरोजगार युवक वणवण भटकत आहेत. या क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी विदर्भात पेट्रोकेमिकल्स व रिफायनरी कॉम्प्लेक्स निर्माण करून लाखो बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खा. अशोक नेते यांनी ३७७ अधीन सुचनेअंतर्गत काल दि. २१ डिसेंबर २०२१ रोजी संसदेत केली व या विकासात्मक व रोजगाराच्या प्रश्नाकडे सभागृहाचे लक्ष वेधले.

या अविकसित क्षेत्राच्या औद्योगिक विकासासाठी विदर्भ इकानोमिक डेव्हलपमेंट कौन्सिल (वेद) तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी व्दारा पेट्रोकेमिकल्स तथा रिफायनरी कॉम्प्लेक्स ची निर्मिती करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासूनची आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत समीक्षा करून मंत्रालयात पत्रव्यवहार केलेला आहे. जून २०२१ मध्ये तत्कालीन पेट्रोलियम मंत्री यांच्यासोबत महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली माझ्या उपस्थितीत विदर्भात पेट्रोकेमिकल्स व रिफायनरी कॉम्प्लेक्स च्या निर्मितीसाठी फिजीब्लिटी स्टडी करण्यात यावे, यासाठी निवेदन सादर करण्यात आले होते मात्र आतापर्यंत यासंदर्भात कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याने सदर काम रखडलेले आहे, सदर प्रकल्प पूर्ण झाल्यास लाखो सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगार मिळेल, असेही यावेळी खा. अशोक नेते यांनी लोकसभेत बोलताना सांगितले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

देशातील सर्वात मागास क्षेत्र असलेल्या विदर्भात पेट्रोकेमिकल्स तथा रिफायनरी कॉम्प्लेक्सच्या निर्मितीसाठी फिजीब्लिटी स्टडीचे यथाशिग्र अवलोकन करून याची निर्मिती करण्यासाठी सकारात्मक निर्णय घेण्यात यावा, जेणेकरून विदर्भ परिसराचा सर्वांगीण विकास होईल व येथील लाखो बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळून ते विकासाच्या प्रवाहात सामील होतील, अशी मागणी खा. अशोक नेते यांनी काल दि. २१ डिसेंबर रोजी ३७७ अधीन सुचनेअंतर्गत लोकसभेत केली.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

प्रख्यात लावणी सम्राज्ञी चैत्राली राजे ‘ओटीटी’व्दारे आणणार लावणी;लावणीला मिळणार आता नवे व्यासपीठ

गोंडवाना विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांचा पाचव्या दिवशी बेमुदत संप कायम!

राज्य सरकारमध्ये ९०० पदांसाठी मोठी भरती

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.