Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

प्रख्यात लावणी सम्राज्ञी चैत्राली राजे ‘ओटीटी’व्दारे आणणार लावणी;लावणीला मिळणार आता नवे व्यासपीठ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क ,

सांगली दि, २२ डिसेंबर : – अस्सल मराठमोळी लावणी आणि लावणी कलाकार संकटात आहेत. नव्या युगाप्रमाणे लावणी बदलली नाही तर ती संपून जाईल.त्यामुळे मी लावणीला ओटीटी प्लॅटफॉर्मवर नेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती प्रख्यात लावणी सम्राज्ञी चैत्राली राजे यांनी आज सांगली मध्ये पत्रकार परिषदेत व्यक्त केला.तसेच जागतिक प्लॅटफॉर्म लावणीला तारेल आणि जुन्या रसिकांसह नवी पिढी, महिलांनाही तो आवडेल, असा विश्‍वासही चैत्राली राजे यांनी व्यक्त केला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कोरोनाचा मोठा फटका फिल्म इंडस्ट्री आणि रंगमंचाला बसला आहे.तर रंगमंचाचा एक भाग असणाऱ्या लावणी कलेवर अद्यापही कोरोनाचे सावट आहेत. मात्र आता या लावणीला नवी ऊर्जा आणि नवं क्षेत्र निर्माण करण्याचे काम प्रख्यात लावणी सम्राट चैत्राली राजे यांनी हाती घेतले आहे. तसेच देशाच्या या नव्या संकटानंतर निर्माण झालेल्या नव्या प्लॅटफॉर्मवर लावणीला घेऊन जाण्याच्या प्रयत्न चैत्राली राजे यांनी घेतलाय.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

त्यासाठी त्यांनी ऑनलाईन ओटीटी प्लॅटफॉर्मवरची निवड केली असून संकटात सापडलेल्या लावली आणि कलाकारांना कथा खोटी प्लॅटफॉर्मचा पर्याय चैत्राली राजे यांच्या माध्यमातून मिळणार आहे आणि शेवटी प्लॅटफॉर्मवर पहिल्यांदाच चैत्राली राजे या ‘नाद करायचा नाय’ ही लावणी सादर करणार आहेत.तर या निमित्ताने चैत्राली राजे यांनी रसिकांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर लावणीला ऊर्जितावस्था देण्यासाठी हातभार लावण्याची साद घालत,राज्य सरकारनेही आता जत्रा, यात्रा अश्या सार्वजनिक ठिकाणी लावणी सादर करण्यासाठी मदत करावी,अशी मागणी देखील केली आहे.

हे देखील वाच

 

गडचिरोली जिल्ह्यात पहिल्यांदाच नेचर सफारी चे उदघाटन

गोंडवाना विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांचा पाचव्या दिवशी बेमुदत संप कायम!

 

Comments are closed.