Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मोठी बातमी: एकनाथ शिंदे सरकारचा उद्या होणार मंत्रिमंडळ विस्तार..

पहिल्या टप्प्यात 15 ते 18 मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता...!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

मुंबई, दि. ८ ऑगस्ट : सत्ता परिवर्तन झाल्यानंतर अखेर नव्या सरकारला मंत्रिमंडळ विस्तारासाठी मुहूर्त मिळाला आहे. त्यामुळें उद्या मंगळवारी मंत्रिमंडळ विस्तार होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. उद्या सकाळी ११ वाजता एकनाथ शिंदे सरकारमधील पहिल्या टप्प्यात १५ ते १८ मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे.

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री शिंदें यांच्या नंदनवन या निवासस्थानी दाखल झाले असून, दुसरीकडे विधिमंडळात देखील सचिवांनी अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. पावसाळी अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक झाल्याचं बोललं जात आहे. अधिवेशन १० ऑगस्ट ते १८ ऑगस्ट पर्यंत होण्याची देखील शक्यता आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पावसाळी अधिवेनची गरज अणि १२ तारखेची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीची टांगती तलवार यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीला मंत्रिमंडळाचा छोटा विस्तार करण्याचे ठरविले आहे.

कोणाला मिळणार मंत्रीमंडळ विस्तारात संधी.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात भाजपकडून ८ सदस्य शपथ घेणार असून, शिवसेनेचे ७ सदस्य शपथ घेणार आहेत. तर अपक्ष समर्थक आमदारांचा अधिवेशना नंतर विस्तारात समावेश करण्यात येणार असल्याचे समजते. तसेच, पहिल्या यादीत अपवाद वगळता जुन्या मंत्र्यांना स्थान मिळण्याची शक्यता कमी

खान्देशातून यांना मिळणार संधी

भाजपकडून डॉ. विजयकुमार गावित अणि अमरीश पटेल यांना संधी मिळणार आहे. तर, गुलाबराव पाटील अणि दादा भुसे यांना शिंदे गटाकडून संधी मिळणार असल्याची खात्रीशिर माहिती मिळाली आहे.

हे देखील वाचा : 

संजय राऊतांचा मुक्काम आता आर्थर रोड जेलमध्ये

 

Comments are closed.