Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली अहेरी उपविभागात पुन्हा पावसाची जोरदार बॅटिंग

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 
  • गडचिरोली अहेरी विभागात पावसाची दमदार हजेरी, काही महत्वाचे मार्ग बंद. 
  • गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा हाहाकार, पाणी पातळीत झाली वाढ. 

गडचिरोली, दि. ८ ऑगस्ट : गेल्या आठवडाभरात गडचिरोली जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली होती त्यामुळे शेतशिवारांमध्ये अंतर्गत मशागतीची कामे वेगात सुरू होती. ही कामे सुरू असताना पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला जाणार का अशी शंका व्यक्त केली जात आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जुलै महिन्यात गडचिरोली जिल्ह्यात संततधार झालेल्या पावसामुळे पूर परिस्थितीचा सामना करावा लागला असतानाच पुन्हा अहेरी उपविभागात कालपासून सतत धार पाऊस असल्याने काही मार्ग बंद झाले असून नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे..

अहेरी उपविभागातील पाच तालुक्यांना जुलै महिन्यात खूप मोठा फटका बसल्याने दयनीय अवस्था निर्माण झाली होती. त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र यांनी भेट देऊन जिल्हा मुख्यालयात आढावा घेतला. नाना पटोले ,माजी उपमुख्यमंत्री अजित पवार सह विजय वडेट्टीवार असे राज्यातील दिग्गज नेत्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आस्थेने विचारपूस करून पूरपरिस्थितीची पाहणी करीत योग्य मोबदला देण्याची मागणी केली आणि पूर परिस्थितीमुळे बेघर झालेल्या नागरिकांना वनविभागाची जमीन अधिग्रहण करून पुनर्वसित करण्याची मागणी केली होती.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

जवळपास 8 जुलै ते 22 जुलै पर्यंत गडचिरोली जिल्हावासीयांना पूर परिस्थितीचा सामना करावा लागला. हळूहळू ही परिस्थिती सावरत असताना पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे .त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.सध्या प्रशासनातर्फे पंचनामे सुरू असून अजूनपर्यंत येथील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई सुद्धा मिळाली नाही. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

सात जुलैच्या रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने आज 8 ऑगस्ट रोजी काही महत्त्वाचे मार्ग बंद झाले आहे. त्यात चांदाळा-कुंभी, रानमुल-माळेमूल, पोटेगाव-देवापूर, साखरा – कारवाफा, मुलचेरा आष्टी, आलापल्ली-भामरागड असे महत्वाच्या मार्गांचा समावेश आहे.

अजूनही मुसळधार पाऊस सुरू असून नदी नाले पाणी पातळीत वाढ झाला आहे, याचबरोबर बरेच मार्ग बंद होण्याच्या स्थितीत आहेत. त्यामुळे कोणत्याही नागरिकांनी जीव धोक्यात टाकून प्रवास करू नये.

Comments are closed.