Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गुरू- शिष्याच्या नात्याला कलंक : आठवीच्या विद्यार्थिनीवर अधीक्षकाने केला अत्याचार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

चंद्रपूर, दि. ८ ऑगस्ट : शिक्षक ही अशी व्यक्ती आहे जी ज्ञान, मूल्ये, सद्गुण प्रदान करते आणि शाळेत विद्यार्थ्यांना प्रेरणा देते. एक शिक्षक आपल्या जीवनात गुरु, पालक, प्रशिक्षक, आणि मुख्य म्हणजे मार्गदर्शक अशा अनेक उल्लेखनीय भूमिका बजावतो, परंतु दुसऱ्यांना योग्य मार्ग दाखवणारा जर स्वतःच अयोग्य मार्गावर असेल तर मग तो शिक्षक कसा? 

पुन्हा एकदा शिक्षकी पेशाला काळीमा फासण्याच कृत्य चंद्रपूर जिल्ह्यातील एका अधीक्षकाने केलय.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

भद्रावती तालुक्यात असलेल्या एका आश्रम शाळेतील अधीक्षकाने आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या १३ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केलाय.या घटनेमुळे जिल्ह्यात तणावाचं वातावरण निर्माण झालय.

खरतर चंद्रपूर जिल्ह्यात मोठ मोठे शाळा महाविद्यालय आहेत. तसेच अनेक खाजगी संस्था देखील आहेत. या ठिकाणी चांगल्या पद्धतीने शिक्षण दिलं जाते. विद्यार्थी देखील येथे उच्च शिक्षण घेण्यासाठी येत असतात. परंतु आपल्याला जीवनातील यशाचा मार्ग दाखवणाऱ्या शिक्षकाकडून जर अशी घृणास्पद घटना होतेय तर याहून वाईट गोष्ट आणखी काय असेल असा विचार आता प्रत्येक सामान्याच्या मनात येतोय.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

काय आहे ते प्रकरण 

उत्तम शिक्षण घेण्यासाठी भद्रावती तालुक्यातील एका खाजगी आश्रम शाळेत सात जुलै रोजी पीडित मुलीच्या पालकांनी मुलीला दाखल केले होते. परंतु काही दिवसानंतर पीडित मुलीची प्रकृती खराब आहे तिला घेऊन जा असा निरोप शाळेतून 4 ऑगस्ट रोजी पीडितेच्या आई वडिलांना आला. सोबतच तिचा दाखला ही काढून घेऊन जा असेही सांगण्यात आले. निरोप येताच पीडितेचे आई वडील निघाले होते परंतु सततच्या पावसामुळे पीडितेचे वडिलांना आश्रम शाळेत पोहोचण्यास थोडा उशीरच झाला. या नंतर पीडितेच्या वडिलांनी मुलीला हिंगणघाट येथे आणले आणि नंतर मुलीच्या पोटाच्या खालच्या भागात दुखत असल्याचे समजल्यावर तपासणीनंतर सर्व प्रकार उघडकीस आला.

प्रकार उघडकीस आल्यावर हिंगणघाट पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी हिंगणघाट पोलिसांनी आश्रम शाळेतील अधीक्षक आरोपी संजय एकनाथ इटनकर (५३) याच्या विरुद्ध पोस्को सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पण घटनास्थळ भद्रावती पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असल्याचे हे प्रकरण पुढील तपासासाठी भद्रावती पोलिसांकडे वळते करण्यात आले आहे.

 

Comments are closed.