Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

19 एप्रिल पर्यंत राज्यात भारनियमातून सामान्य स्थितीत वीजपुरवठा सुरळीत करण्याकडे आपला प्रयत्न – ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

नागपूर, दि. १५ एप्रिल :  सर्व कोळसा खाणी या केंद्र शासनाच्या मालकीच्या आहेत. खाजगी कंपन्या त्यांचा कोळसा कंत्राट दिल्या शिवाय ते विकू शकत नाहीत. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी सल्ले देण्याऐवजी कोल इंडिया लिमीटेडच्या महावितरणसोबत झालेल्या कंत्राटाकडे लक्ष केंद्रित करावे असे आवाहन राज्याचे उर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज केले, ते आज नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

प्रदेशात भारनियमन होऊ नये यासाठी केंद्र शासनाने उरण प्रकल्पात गॅस, तसेच इतर प्रकल्पात कोळसा, रॅक्स उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. राज्यात काही औष्णीक प्रकल्पात दीड ते सहा दिवस पुरेल इतकाच कोळसा विजनिर्मिती साठी शिल्लक असून जल विदयुत प्रकल्पातही जास्तीचे पाणी उपलब्ध करून देण्यास आपण जलसंपदा मंत्र्यांना सांगितले असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले . १९ एप्रिल पर्यंत राज्यात भारनियमातून सामान्य स्थितीत वीजपुरवठा सुरळीत करण्याकडे आपला प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा : 

धक्कादायक! स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवकाने केली आत्महत्या

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

भीषण अपघात : कार अपघातात सासू-सुनेचा जागीच मृत्यू सहाजण गंभीर जखमी 

वाघाच्या हल्ल्यात दोनजण गंभीर जखमी; वाघ बघायला जाणे बेतले जीवावर

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.