Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

धक्कादायक! स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवकाने केली आत्महत्या

बुलडाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा गावातील नारायण दिगंम्बर गिर्हे यांनी नोकरी लागत नसल्याने केली आत्महत्या.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

बुलढाणा, दि. १५ एप्रिल :  स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या एका युवकाने नोकरी लागत नसल्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा गावात राहणारा नारायण दिगंम्बर गिर्हे नामक २४ वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याने एकच खळबळ माजली आहे.

नारायण गेल्या ४ वर्षांपासून स्पर्धा परीक्षांची तयारी करत होता, वडिलांचे छत्र हरवलेल्या नारायण ला कुठल्याही परिस्थितीत नोकरीला लागून आपल्या आई व बहिणीचा सांभाळ करायचा होता, त्यासाठी तो अहोरात्र अभ्यास करून मेहनत घेत होता, मात्र राज्य सरकार स्पर्धा परीक्षा घेत नव्हतं आणि एखादी घेतलीच तर भ्रष्टाचाराच्या आरोपाने ती परीक्षाही रद्द व्हायची त्यामुळे मेहनत घेऊन सुद्धा आपल्याला नोकरी मिळत नसल्याने नैराश्यातून नारायण ने हे टोकाचं पाऊल उचललं असल्याचं त्याच्या कुटुंबायांकडून सांगण्यात येत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

देशात बेरोजगारीचा दर सध्या शिखर गाठतोय, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे अनेक युवक नोकरी नसल्याने वैफल्यग्रस्त असल्याचं पाहायला मिळत आहे. अशात मेहनत घेऊनही सरकारी अनास्थेपाई नोकरी लागत नसल्याने नारायण ने आत्महत्या करून जगाला निरोप दिलाय. अभ्यासात हुशार असलेल्या नारायण ला आपल्या आई- बहिणीला सहारा द्यायचा होता मात्र परीक्षाच वेळेवर होत नसल्याने उमेदीच वय हातातून निघून जात असल्याने तो निराश होता.

त्यामुळे आकाशी उंच झेप घेण्याची स्वप्न पाहणाऱ्या या तरुण पिडीला रोजगार उपलब्ध करून देणे सरकारची जबाबदारी आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

वाघाच्या हल्ल्यात दोनजण गंभीर जखमी; वाघ बघायला जाणे बेतले जीवावर

वकील गुणरत्न सदावर्ते यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी

भीषण अपघात : कार अपघातात सासू-सुनेचा जागीच मृत्यू सहाजण गंभीर जखमी 

Comments are closed.