Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दिलेला शब्द केला पूर्ण; माजी.आ.दीपक आत्राम यांचे होत आहे सर्वत्र कौतुक !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली दि,१५ एप्रिल : एटापल्ली तालुक्यात माजी आ. दिपक आत्राम यांनी मागील महिन्यात नक्षलग्रस्त भागात दौरे करून स्थानिक नागरिकांच्या अडचणी , तसेच विविध समस्या जाणून घेण्यासाठी स्थानिक गावात बैठका घेतल्या होत्या .त्यावेळी नागरिकांच्या समस्या लक्षात घेवून निराकरण करण्यासाठी शब्द दिला आणि ते काम  पूर्ण होत असल्याने दिलेले शब्द पूर्ण झाल्याने स्थानिकात  समाधान व्यक्त केले जात आहे .

एटापल्लीतील  तोडसा ग्रामपंचायतच्या गावातील नागरिकांनी  एटापल्ली टोला ते झारेवाडा पर्यंत मंजूर असलेले रस्त्याचे बांधकाम मागील तीन वर्षांपासून रखडलेले असून ते काम लवकरात लवकर सुरू करण्यासाठी नागरिकांनी  मागणी माजी आ. आत्राम  रेटून धरली होती.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

त्यावेळी समस्यांचे गांभीर्य ओळखून  एकरा बु येथे बैठक घेत नागरिकांच्याया समस्या सोडविण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली. त्यावेळी  बैठकीला प्रामुख्याने आविसचे नेते तथा माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार , उपविभागीय अभियंता ,बांधकाम कंत्राटदार यांना हि पाचारण करण्यात आले .

त्यावेळी  नागरिकांच्या रस्त्याच्या अडचनी  दूर करण्यासाठी विषय रेटून धरला गेल्याने उपस्थित अधिकार्यांनी वरिष्ठ अधिकार्यांना माहिती अवगत करून दिल्याने लगेच  सदर कामाची दखल घेत दोन ते तीन दिवसात रस्त्याचे बांधकाम सुरू करणार असल्याचे संकेत दिले .

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

त्यामुळे आठ ते दहा गावांना ये _जा करण्यासाठी चांगली व्यवथा  निर्माण होणार असल्याने  ” त्या परिसरातील नागरिकांनी दिलेला शब्द पूर्ण झाल्याने”  माजी आ. दिपक आत्राम आणि माजी जि.प.अध्यक्ष  अजय  कंकडालवार   यांचे आभार मानले.

याप्रसंगी  नंदूभाऊ मत्तामी आविस तालुकाध्यक्ष एटापल्ली, राहुल झोडे बांधकाम कंत्राटदार, कुमरे उपविभागीय अभियंता, बोधलवार , उपविभागीय अभियंता, गागापूरवार , सहाय्यक अभियंता,मंगेश हलामी माजी प स सदस्य एटापल्ली, मुन्नीताई धुर्वा माजी सरपंच तथा ग्रा प सदस्य तोडसा,संगीताताई धुर्वा माजी प स सदस्य,सम्मा गोटा पोलीस पाटील,रैनू नरोटे,सुधाकर नरोटे,कन्ना नरोटे,किशोर तिंमा, कोकण सरकार,लुला नरोटे,रामजी नरोटे,महारु गोटा एकरा,रानू गोटा एकरा, माजी सरपंच विजय कुसनाके आलापल्ली,जुलेख शेख,प्रशांत गोडशेलवार नगरसेवक अहेरी,प्रमोद गोडशेलवार, परिसरातील नागरिक व आविसचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.

हे देखील वाचा,

वकील गुणरत्न सदावर्ते यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी

वाघाच्या हल्ल्यात दोनजण गंभीर जखमी; वाघ बघायला जाणे बेतले जीवावर

वकील गुणरत्न सदावर्ते यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी

 

Comments are closed.