Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

धक्कादायक! एक तर्फी प्रेमातून अल्पवयीन युवतीचा खून..

साताऱ्यातील पिंपोडे बुद्रुक येथील घटना. या घटनेनंतर संशयित युवकांनी विषारी औषध केले प्राशन.. युवकावर उपचार

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

सातारा, दि. ६ मार्च : साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यात पिंपोडे बुद्रुक गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. एक तर्फी प्रेमातून एका युवकाने अल्पवयीन मुलीला चाकूने भोकसले असून धक्कादायक बाब म्हणजे साताऱ्यातील खाजगी रुग्णालयात मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

या दरम्यान संशयित आरोपी निखिल कुंभार याने स्वतः विषारी औषध प्राशन करून तो कोरेगाव पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाला आहे. यावेळी पोलिसांनी त्याला तात्काळ कोरेगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. गेल्या अनेक दिवसापासून निखिल राजे हा संबंधित युवतीच्या प्रेमात पडला होता मात्र मुलीकडून कोणताही प्रतिसाद येत नसल्यामुळे त्याने आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पिंपोडे बुद्रुक या ठिकाणी असणाऱ्या एसटी स्टँड परिसरात एका खाजगी क्लासच्या बाहेर युवतीच्या पोटात चाकू भोकसुन जखमी केले होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यानंतर स्थानिक नागरिकांनी तिला तात्काळ उपचारासाठी साताऱ्यातील रुग्णालयात उपचार दाखल केल्यानंतर उपचारा दरम्यान संबंधित युवतीचा मृत्यू झाला आहे. संबंधित युवकावर वाठार आणि कोरेगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा करण्यात आला आहे.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण

विदर्भ आर्थिक दृष्या संपन्न व्हावा या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन – केंद्रीय मंत्री नितिन गडकरी

राज्यपाल भगतसिंह कोशयारी यांनी शिवाजी महाराज व सावत्री बाई फुले यांच्या बद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाचा शरद पवार यांनी घेतला खरपूस समाचार

 

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.