Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वाहनांच्या ध्वनी प्रदूषणाबाबत लवकरच नवा कायदा करणार – केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

सांगली, दि. २६ मार्च : देशात लवकरचं ध्वनी प्रदूषणाबाबत नवा कायदा आणला जाणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितिन गडकरी यांनी दिली आहे. वाहनांना कर्कश्श हॉर्न ऐवजी पारंपारिक वाद्यांचा आवाजातील हॉर्न बसवण्याबाबत हा कायद्या लवकरचं केला जाणार असल्याचे मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले आहे. सांगली येथे पुरुषोत्तम नारायण गाडगीळ सराफ पेढीच्या १९० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित समारंभात ते बोलत होते.

सांगलीचे आमदार सुधीर घाडगे यांच्या पुरुषोत्तम नारायण गाडगीळ सराफ आणि जव्हेरी पेढीचा १९० वा वर्धापन दिन केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितिन गडकरी यांच्या उपस्थिती मध्ये सांगली मध्ये पार पडला. त्यानिमित्ताने मंत्री नितिन गडकरी यांची प्रकट मुलाखत आयोजित करण्यात आली होती.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

प्रसिद्ध अभिनेते राहुल देशपांडे यांनी एक तासाची प्रकट मुलाखत घेतली. त्यामध्ये अनेक पैलूंचा उलगडा केला.यावेळी बोलताना गडकरी म्हणाले, आपल्या देशात पाणी, वायू आणि ध्वनी प्रदूषण ही समस्या बनली आहे,त्यामुळे केंद्रीय जलसंपदा खात्याच्या माध्यमातून देशातील पाण्याचे प्रदूषण कमी करण्याचे काम केलं. त्यानंतर देशात उत्कृष्ट रस्ते आणि पूल निर्माण करण्याचे कामही सुरू आहे.

या ठिकाणी वायु प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न सुरू आहेत, आणि पुढचा भाग म्हणून वाहनांच्या माध्यमातून होणारे ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी वाहनांच्या कर्कश हॉर्नसाठी नवा कायदा करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्कश आवाजा ऐवजी पारंपारिक बासुरी,माऊथ आर्गॉन, बिगुल अशा वाद्यांचा आवाज असणार आहे. आणि लवकरच हा कायदा होणार असल्याची माहिती प्रकट मुलाखत दरम्यान मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. तसेच देशात राष्ट्रीय महामार्ग निर्माण करताना बॉण्डच्या माध्यमातून सर्वसामान्यांकडून गुंतवणूक करून महिना ७ टक्के व्याज देण्याचं धोरण बनवले आहे.त्यासाठी सेबी कडे परावनगी देखील मागितली आहे. ज्यामुळे सर्व सामन्या जनतेला फिक्स डिपॉझिटचा चांगला परतावा नक्क्की मिळेल, असा मानस यावेळी मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

धक्कादायक! अनैतिक संबंधातुन एकाचा खून : एकाला अटक

मुस्लिम प्रिन्सिपल महिलेच्या राजीनाम्यानंतर हिजाब प्रकरणाची विरारमध्ये चर्चा

अचानक लागली घराला आग, आगीत वडिलांचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.