Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मुस्लिम प्रिन्सिपल महिलेच्या राजीनाम्यानंतर हिजाब प्रकरणाची विरारमध्ये चर्चा

विवा कॉलेज आपल्या भूमिकेवर ठाम...

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

विरार, दि. २६ मार्च : विरारच्या विवा लॉ कॉलेजच्या मुस्लिम प्रिन्सिपल महिलेने कॉलेजच्या वातावरणाला कंठाळून राजीनामा दिला. तसेच त्यांनी राजीनामा देताना मला माझं कर्तव्य बजावत असताना त्रास होत आहे. अनेक अडचणीचा सामना करावा लागत असल्याने मी माझ्या पदाची राजीनामा देत आहे.

मुस्लिम प्रिन्सिपल महिलेने कॉलेजमध्ये राजीनामा दिल्यानंतर कर्नाटक हिजाब प्रकरणाची चर्चा सध्या विरारमध्ये सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे. मात्र विवा कॉलेजच्या व्यवस्थापणाकडून हे सगळे आरोप खोडून काढण्यात आले आहेत. कर्नाटक हिजाब प्रकरणाचा सध्याच्या प्रकरणाशी कसल्याही प्रकरचा संबंध नसल्याचा दावा कॉलेज व्यवस्थापनाकडून सांगण्यात आलं आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या सर्व प्रकरणात राजीनामा देणारी मुस्लिम प्रिन्सिपल महिला अद्याप समोर आलेली नाही. त्याचबरोबर आपली प्रतिक्रिया किंवा त्यांच्यावर झालेल्या अन्यायाची प्रत्यक्ष वाच्यता कुठेचं केलेली नाही. याबाबत वसई विरार नालासोपारा परिसरातील कोणत्याही पोलीस ठाण्यात तक्रार किंवा गुन्हा नोंद केला नसल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र मॅनेजमेंटला दिलेल्या राजिन्यात मला माझं काम करताना अनेक अडचणी येत आहेत.

तसेच कॉलेजमधील वातावरण माझ्या कामासाठी योग्य नसल्याचं म्हटलं आहे. अशा आशयाचा मेल त्यांनी कॉलेज मॅनेजमेंटला पाठवला आहे. त्यांनी राजीनामा पत्रात कुठेही हिजाबचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे या प्रिन्सिपल मुस्लिम महिलेने हिजाब प्रकरणातून राजीनामा दिला. किंवा कॉलेज परिसरातील अन्य काही कारण होते हे मात्र स्पष्ट झालेले नाही.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

कोणाचीही नोकरी जाणार नाही, कर्मचाऱ्यांनो 31 मार्चपर्यंत कामावर रूजू व्हावे – मंत्री, ॲड. अनिल परब यांचे एसटीच्या कर्मचाऱ्यांना आवाहन

“वस्त्रोद्योग क्षेत्रात भारताने आपले गतवैभव पुनश्च प्राप्त करावे” : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी 

 

 

Comments are closed.