Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दिग्गज क्रिकेटपटू… आता बॉलिवूडच्या ‘या’ सिनेमात करणार लीड रोल

क्रिकेटच्या मैदानात तुफान बॉलिंगनंतर बॉलिवूडमध्ये करणार जलवा

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

मुंबई डेस्क, दि. २१ जून : भारताचा वेगवान गोलंदाज एस श्रीसंत याने मैदानात आपल्या कामगिरीनं जलवा केला. आता क्रिकेटच्या मैदानातून थेट बॉलिवूडमध्ये आपली छाप उठवण्यासाठी जात आहे. एस श्रीसंत एका सिनेमात लीड रोल करणार असल्याची माहिती मिळाली आहे. या बातमीमुळे क्रिकेटप्रेमींना खूप आनंद झाला आहे.

श्रीसंतने कॅप्टन कूल धोनीच्या नेतृत्वामध्ये 2007 मध्ये टी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्डकपसाठी खेळला होता. तो वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सहभागी झाला होता.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

2013 मध्ये आयपीएलमध्ये मॅच फिक्सिंगमध्ये अडकल्यानंतर बीसीसीआयने त्याच्यावर बंदी लावली होती. ही बंदी गेल्यावर्षी उठवण्यात आली आहे.

श्रीसंतला सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आणि केरळसाठी खेळण्याची परवानगी देखील मिळाली होती. श्रीसंत सध्या बॉलिवूडमध्ये येण्यासाठी तयारी करत आहे. पट्टा नावाचा सिनेमासोबत त्याने कॉन्ट्रॉक्ट केलं असून त्यामध्ये लीड रोलमध्ये श्रीसंत दिसणार आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या सिनेमामध्ये श्रीसंत सीबीआय अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरेल अशी सर्वांनाच आशा आहे.

श्रीसंतने मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये जबरदस्त कामगिरी केली. मात्र आयपीएलच्या लिलावात त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. श्रीसंत पुन्हा आयपीएल कधी खेळणार याकडे देखील सर्वांचं लक्ष असणार आहे.

हे देखील वाचा  :

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर!,आता IRCTC मधून तिकीट रद्द केल्यावर लगेच मिळणार रिफंड

नियमित योगा करून आरोग्याची काळजी घ्या – खा. अशोक नेते

चक्क! १ हजार मिटरच अंतर अवघ्या सहा मिनीटं एक सेकंदात कापलं ‘या’ चिमुकलीने

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.