Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नियमित योगा करून आरोग्याची काळजी घ्या – खा. अशोक नेते

योग शिबिरात खा. अशोक नेते यांचे आवाहन.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. 21 जून : आजच्या आधुनिक धावपळीच्या जीवनात योगाला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले असून निरोगी व उत्तम आरोग्यासाठी व्यायामाची सगळ्यांना नितांत आवश्यकता आहे. नियमितपणे योगा व व्यायामाने आपण अनेक आजारांना दूर सारून सुदृढ जीवन जगू शकतो.

त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी दररोज सकाळी किमान अर्धा किंवा १ तास योगा/ व्यायाम करावा व आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे अनुसूचित जनजाती मोर्चा चे राष्ट्रीय महामंत्री तथा खा. अशोक नेते यांनी केले. आज सकाळी योग दिनानिमित्त योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी १ तास योगा केल्यानंतर नागरिकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

    आंतरराष्ट्रीय योगदिना निमित्य भारतीय जनता पार्टी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राच्या वतीने खा. अशोक नेते यांच्या जनसंपर्क कार्यलयाच्या वर योग शिबीर घेण्यात आले. यावेळी खा. अशोक नेते यांनी योग शिबिरात सहभागी होऊन योग दिननिमित्य स्वतः १ तास योगा करून नागरिकांना उत्तम आरोग्यासाठी नियमित योगा करण्याचा संदेश दिला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

याप्रसंगी योगा शिक्षक म्हणून बजरंग दलाचे जिल्हा संयोजक रामायणजी खटी, भाजपचे जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा, आदिवासी मोर्चा चे प्रदेश सरचिटणीस प्रकाश गेडाम, जिल्हा उपाध्यक्ष डॉ भारत खटी, अनिलजी पोहनकर, भाजपचे अरूणजी हरडे, नप उपाध्यक्ष अनील कुणघाडकर, भाजयुमो चे शहर अध्यक्ष सागर कुमरे, शहर महामंत्री विनोद देवोजवार, श्रीकांत पतरंगे, श्यामजी वाढई, राकेश राचमलवार, स्वीयसहाय्यक रविंद्र भांडेकर उपस्थित होते.

योग शिबिर यशस्वी करण्यासाठी दिनेश नंदनवार, दिपक वालदे, अमित हेमके यांनी अथक परिश्रम घेतले.

हे देखील वाचा :

पर्यावरण संवर्धनाचा संदेश घेऊन सायकलने निघाली ‘ती’ महाराष्ट्र भ्रमंतीला!

चक्क! १ हजार मिटरच अंतर अवघ्या सहा मिनीटं एक सेकंदात कापलं ‘या’ चिमुकलीने

(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात वैद्यकीय अधिकारी पदाची भरती

 

Comments are closed.