Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

एस.टी. महामंडळाला ३०० कोटींची मदत शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  

मुंबई, दि. १३ ऑक्टोंबर : महाविकास आघाडीच्या सत्तेत एस.टी.महामंडळ कर्मचाऱ्यांनी केलेला बंद खूप दिवसांनी शमला होता परतू त्यावर ठोस तोडगा मात्र निघाला नव्हता. सध्या राज्यात शिंदे सरकारने एस.टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ३०० कोटी रुपयांची मदत एसटी महामंडळाला देण्याचा निर्णय घेतला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रत्येक महिन्याच्या पगारासाठी ३६० कोटी रुपयांच्या निधीची गरज भासते. पण राज्य सरकारने ३०० कोटी रुपयांचीच मदत जाहीर केली आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या मदतीवरुन महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे.

जेवढी मागणी केली तेवढा निधी सरकारनं द्यावा, अन्यथा सरकारविरोधात पुन्हा संघर्ष उभा करावा लागले असा इशारा बरगे यांनी दिला आहे.कर्मचाऱ्यांचे वेतन थकल्यामुळे एसटी कर्मचारी शिंदे सरकारवर नाराज झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

दर महिन्याला एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ३६० कोटी रुपये लागतात. परंतु तीन महिन्यामध्ये शिंदे सरकारकडून फक्त ६०० कोटी रुपयांची रक्कमच राज्य सरकारने एसटी महामंडळाला दिला असल्याची माहिती महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिली आहे. एसटी महामंडळाकडून ७३८ कोटी रुपयांची मागणी केली होती. आता फक्त ३००कोटी रुपयेच देण्यात आले आहेत.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

मुंबई हायकोर्टाचा बीएमसी ला दणका

टीम इंडियाने वर्ल्ड कपआधी कॅप्टन बदलला

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.