Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

बुर्गी येथील अंगणवाडी मदतनीस पदाची नव्याने पदभरती करा

गावकऱ्यांनी केली प्रकल्प अधिकाऱ्यांसह माजी आ.दीपक आत्राम यांच्या कडे मागणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

एटापल्ली 13 ऑक्टोबर :-  एटापल्ली तालुक्यातील बुर्गी येथील अंगणवाडी केंद्रात रिक्त असलेल्या मदतनीस या पदावर एका महिलेची नियमबाह्यरित्या नियुक्ती झाल्याने ही नियुक्ती तात्काळ रद्द करून नियमानुसार जाहिरात काढून नव्याने पदभरती करण्याची मागणी येथील गावकऱ्यांनी एटापल्ली येथील बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांना गावकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात, मदतनीस या पदासाठी कोणत्याही प्रकारचे जाहिरात काढण्यात आलेली नाही.या पदासाठी गावातल्या अनेक विधवा व परितक्त्या महिला इच्छूक असतांना सुद्धा या प्राधान्य महिलांना डावलून संबंधितांनी नियमबाह्य रित्या एका महिलेची निवड केली.करिता ही पदभरती पूर्णतः रद्द करून नव्याने मदतनीस पदासाठी मुलाखत घेण्याची मागणी केली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

बुर्गी येथील गावकऱ्यांनी मदतनीस या पदभरतीत गावातील इच्छूकांवर झालेल्या अन्यायाबाबत माजी आमदार दिपक दादा आत्राम यांना निवेदन दिले असता त्यांनी जिल्हा बालविकास अधिकारी तथा उप मुख्यकार्यकारी अधिकारी जि. प. गडचिरोली इंगोले यांच्या सोबत भ्रमणध्वनी द्वारे संपर्क करून सदर समस्या बद्दल सविस्तर पणे चर्चा करून गावकऱ्यांना न्याय देण्याची विनंती केली असता इंगोले  यांनी चौकशी करून दोषींवर कार्यवाही करून गावकऱ्यांना न्याय देण्याचे आश्वासन दिले. यावेळी माजी जि.प.सदस्य संजयभाऊ चरडुके, माजी सरपंच विजय कुसनाके, संदीप बडगे, रमेश गावडे, प्रफुल दुर्गे, रामा तलांडी, अशोक हिचामी, मल्ला गावडे, विनोद हिचामी उपस्थित होते.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.