Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

खोटे लग्न लावून देऊन तरूणाची फसवणूक; पाचजणांवर गुन्हा दाखल

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

सांगली, दि. ४ फेब्रुवारी : खोटे लग्न लावून देऊन तरूणाची फसवणूक केल्याप्रकरणी पाच जणांवर विटा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाने विट्यासह खानापूर तालुक्यात खळबळ माजली आहे.

खोटे लग्न लावून देऊन माझ्याकडून रोख दोन लाख रुपये, एक तोळे सोने, साडेतीन भाराचे चांदीचे दागिने घेऊन पाचजणांनी फसवणूक केल्याची फिर्याद गणेश बबन कुंभार (४१) या तरुणाने विटा पोलिसात दिली. वर्षा बजरंग जाधव, हिंदुराव पवार, स्वाती सरीता प्रदिप पवार, दशरथ शिंदे अशी फसवणूक करणाऱ्यांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

ही फसवणूक २८ डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास वर्षा जाधव यांच्या सुलतानगादे येथे घरी करण्यात आली. वरील पाचजणांनी संगनमताने माझ्याकडून पैसे व दागिने घेऊन स्वाती हिच्याशी माझे खोटे लग्न लावून देऊन फसवणूक केली असून वर्षा जाधव हिने आमच्या घरी चौकशीला आल्यास कुंभार यांच्या बहिणीला पाय मोडीन अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान खोटे लग्न लावून चक्क तरुणाचीच फसवणुक झाल्याचा गुन्हा विटा पोलिसांत दाखल झाल्याने नवतरुणात माञ संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

जिजाऊच्या जन्मस्थळाला वंदन करून धन्य झालो- राज्यपाल भगतसिंग कोशयारी

धक्कादायक!! बांधकाम मजुराची केली हत्या अन् पोत्यात भरून फेकला मृतदेह!

धक्कादायक! जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरु असतानाच महिलेची प्रसूती

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.