Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जिजाऊच्या जन्मस्थळाला वंदन करून धन्य झालो- राज्यपाल भगतसिंग कोशयारी

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील राजमाता जिजाऊंच्या पुतळ्याला केले अभिवादन.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

बुलढाणा, दि. ४ फेब्रुवारी : सिंदखेडराजा येथील माँ जिजाऊंच्या जन्मस्थळाचे दर्शन घेऊन धन्य झालो असल्याची प्रतिक्रिया राज्यपाल भगतसिंग कोशयारी यांनी दिली आहे. सोबतच सिंदखेडराजा नगरीचा विकास करून या ठिकाणी जागतिक पर्यटक येतील व सिंदखेड राजा येथील अर्थकारण गतिमान होण्यासाठी प्रयत्न करेल असंही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी यावेळी सांगितलं.

आज ४ फेब्रुवारी रोजी महामहिम राज्यपाल हे बुलडाणा जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी राजमाता जिजाऊंचे जन्मस्थळ असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील राजे लखोजी जाधव यांच्या राजवाड्याला भेट देऊन त्यांनी राजमाता जिजाऊ आणि बाल शिवाजींच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केलं त्यानंतर राजवाड्याची पाहणी महामहिम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी त्यांचे समवेत पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे, नगराध्यक्ष सतीश तायडे, माजी नगराध्यक्ष ॲड नाझेर काझी, जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, वंशज शिवाजीराजे जाधव, नागपूर येथील पुरातत्व संचालनालयाच्या सहायक संचालक जया वहाने, उपविभागीय अधिकारी भूषण अहीरे, तहसिलदार सुनील सावंत आदी अन्य मान्यवर उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्मस्थळवर येऊन माझे जीवन माझे जीवन धन्य झाले ज्या आईने छत्रपती शिवाजी महाराज सारख्या देशाच्या परमभक्त युगप्रवर्तक जन्म दिला त्यांच्यावर सर्व देश गर्व करतोय अशा मातेला माझं नमन मी केलयं माझं भाग्य आहे या पुण्यभूमीचा विकास झाला पाहिजे अशी माझी भूमिका आहे.

या जन्मस्थळाला देश-विदेशातून लोक भेट देण्यासाठी पर्यटक आले पाहिजे असा आपला प्रयास असल्याची प्रतिक्रियाही महामहीम राज्यपाल यांनी यावेळी व्यक्त केली भेट दिल्यानंतर राजे लखुजी जाधव यांचे वंशज राजे शिवाजी राजे जाधव यांनी महामहिम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा सत्कार केला व त्यांना राजे लखुजी जाधव यांची प्रतिमा भेट दिली. तर प्रशासनाच्यावतीने महामहिम राज्यपाल यांना राजमाता जिजाऊची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला.

राजवाड्याच्या दरवाजापासून ते आतील सर्व भागाची पाहणी 

राजवाड्याच्या दरवाजापासून ते आतील सर्व भागाची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पाहणी केली. दरवाजावर असलेले वैशिष्ट्य पूर्ण नारळाचे दगडी तोरण, दरवाजाच्या आतील नगारखाना, तसेच आतील विविध भाग त्यांनी पाहिले व माहिती जाणून घेतली. राजमाता जन्मस्थळी जाऊन त्यांनी दर्शन घेतले.

मंदाकिनी खंडारे या महिला गाईडने त्यांना राजवाडाविषयी सर्व माहिती दिली. त्याबद्दल राज्यपालांनी तिचे कौतुक केले व अभिप्राय पुस्तकात नोंदही केली. या ठिकाणी वंशज श्री. जाधव कुटूंबियांतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी माध्यमांशी बोलताना म्हणाले,  राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळाला भेट देऊन मी स्वतःला धन्य समजतो. मी या भूमीला नमन करतो.

या ठिकाणचा सर्वांगीण विकास व्हावा, असे पालकमंत्री डॉ शिंगणे यांना सांगितले.  या ठिकाणी देश विदेशातून पर्यटक येऊन येथील अर्थचक्राला गती येईल, अशा पद्धतीने विकासाचे नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी प्रशासनास दिल्या.

ऐतिहासिक मोती तलावाची पाहणी

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सिंदखेड राजा येथील  ऐतिहासिक मोती तलावाची पाहणी केली. यावेळी त्यांचे समवेत पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे, नगराध्यक्ष सतीश तायडे, माजी नगराध्यक्ष ॲड नाझेर काझी, जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, वंशज शिवाजीराजे जाधव, नागपूर येथील पुरातत्व संचालनालयाच्या जया वहाणे, उपविभागीय अधिकारी भूषण अहीरे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी वंशज शिवाजीराजे जाधव यांनी तलावाच्या बांधकामाची ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगितली. या तलावातून होणाऱ्या सिंचन व्यवस्थेची रचना तसेच तलावातील अतिरिक्त पाण्याचे सांडव्यातून होणारे निचरा व्यवस्थापन याबाबत माहिती दिली.

या तलावाच्या पर्जन्य क्षेत्रात वृक्ष लागवड करावी. तसेच तलाव परिसरात वृक्ष लागवड व संवर्धन करावे, असे निर्देश राज्यपाल कोश्यारी यांनी यावेळी प्रशासनाला दिले.

हे देखील वाचा : 

धक्कादायक! जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरु असतानाच महिलेची प्रसूती

धक्कादायक!! बांधकाम मजुराची केली हत्या अन् पोत्यात भरून फेकला मृतदेह!

केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या पोलीस महानिरीक्षकांनी प्राणहिता पोलीस कॅम्पला दिली भेट

 

 

 

 

Comments are closed.