Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सिपेट प्रकल्प नाशिकमध्ये होणार; हजारो बेरोजगारांना नोकऱ्या मिळणार!

नाशिकमध्येच अखेर सिपेट प्रकल्प होणार असून त्यासाठी केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. या प्रकल्पामुळे नाशिकमध्ये हजारो रोजगारांची निर्मिती होणार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

नाशिकः दि,०३ नोव्हेंबर : अखेर बहुचर्चित सिपेट प्रकल्प नाशिक मध्येच होणार असून त्यासाठी राज्य सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. केंद्राने तत्त्वतः मान्यता दिली असून, त्यांना रितसर पुढी आठवड्यात प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.

या प्रकल्पामुळे नाशिकमध्ये हजारो रोजगारांची निर्मिती होणार आहे, अशी माहिती खा. हेमंत गोडसे यांनी दिली. खरे तर केंद्र सरकारने पनवेल येथे हा प्रकल्प उभारायला मंजुरी दिली होती. मात्र, त्यासाठी १५ एकर जागा हवी होती. पनवेल येथे या प्रकल्पासाठी इतकी जागा मिळाली नाही.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

त्यामुळे हा प्रकल्प गुंडाळला जावून तो राज्याबाहेर जाण्याची भीती होती. याची माहिती खा. हेमंत गोडसे यांना मिळाली. त्यांनी हा प्रकल्प नाशिकमध्ये आणण्यासाठी चक्रे फिरवली. या प्रकल्पासाठी जमीन देण्याची तयारी दर्शवली. याबाबत कंपनीच्या प्रमुखांची भेट घेतली. त्यांच्यासमोर आपली बाजू मांडली. सोबतच नाशिकमध्ये हा प्रकल्प उभारावा यासाठी दिल्लीमध्ये जोर लावला. त्यांनी तत्त्वता मान्यता दिली.

खा.हेमंत गोडसे राज्य सरकारडे या प्रकल्पासाठी तगादा लावला असून गोवर्धन शिवारातील एक जागा या प्रकल्पासाठी निश्चित केली. 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

खा.हेमंत गोडसे यांनी गोवर्धन शिवारातील एक जागा या प्रकल्पासाठी निश्चित केली. केंद्राच्या पथकालाही या जागेची माहिती दिली. या पथकाला ही जागा दाखवली. त्यानंतर राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू केला. राज्य सरकारनेही आपला वाटा उचलण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार आता केंद्र सरकार पन्नास आणि राज्य सरकार पन्नास टक्क्यांच्या निधीचा वाटा उचलणार आहे. राज्याचे सचिव सीताराम कुंटे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत गोवर्धन शिवाराच्या जागेवर मोहोर उमटवण्यात आली आहे. आता पुढील आठवड्यात या प्रकल्पाबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर केला जाणार आहे.

हे देखील वाचा,

बेस्ट आर्टीस्ट पुरस्काराने मोनिका भडके सन्मानित

पालघरमध्ये विवाहित महिलेची निर्घुण हत्या!

आदीवासिंची परंपरा,संस्कृती टिकण्यासाठी पारंपरिक नाच गाणे मेळावे गरजेचे . विवेक पंडित

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.