Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

बेस्ट आर्टीस्ट पुरस्काराने मोनिका भडके सन्मानित

सिने अभिनेत्री अमिषा पटेल यांच्या हस्ते सन्मानित.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली दि,०३ नोव्हेंबर : इंडियाज बेस्ट मेकअप आर्टीस्ट व मिसेस इंडिया स्टार २०२१ मध्ये स्टायलिश लूक पुरस्काराने मोनिका भडके यांना सिने. अभिनेत्री अमिषा पटेल यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

चंद्रपूर येथे २८ ऑक्टोबर  ला ग्लॅमरस ब्यूटी यांच्यातर्फे इंडियाज बेस्ट मेकअप आर्टीस्ट व मिसेस इंडिया स्टार २०२१ कार्यक्रम आयोजित करण्यात आला.यामध्ये अनेक युवतींनी सहभाग नोंदविला होता. मात्र या स्पर्धेत अंतिम फेरीत मोनिका भडके यांनी  आपले स्थान निर्माण करून स्पर्धेमध्ये परिक्षकांवर आपली छाप सोडून  स्टायलिश ब्युटी अवॉर्ड पुरस्कार प्राप्त केल्याने जिल्हाभरात कौतक होत आहे.

हे देखील वाचा ,

पालघरमध्ये विवाहित महिलेची निर्घुण हत्या!

Comments are closed.