Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कासवाची शिकार करणाऱ्या चार आरोपींना अटक; वनविभागाची धडक कारवाई

आलापल्ली वनपरीक्षेत्रातील कक्ष क्रमांक ८१ मधील घटना.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  

गडचिरोली, दि. १ डिसेंबर : आलापल्ली वनविभागात कासवांची शिकार करणाऱ्या चार आरोपींना वनाधिकाऱ्यांनी अटक केल्याची घटना आलापल्ली वनपरीक्षेत्रातील कक्ष क्रमांक ८१ मध्ये घडली.

सदर प्रकरणात आरोपीकडून ५ कासव, २२ खेकडे, २ दुचाकी, ३ टार्च व मासे पकडण्याची जाळी जप्त करण्यात आली आहे. रामपद लक्ष्मण हलदर, गोपाल ललीत बाईन, फटीक देवेंद्र मंडल, नित्यानंद मनोहर हलदर सर्व रा. हरीनगर ता. मुलचेरा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आलापल्ली वनपरिक्षेत्राचे अधिकारी व कर्मचारी हे रात्र गस्त घालीत असतांना त्यांना कक्ष क्रमांक ८१ मध्ये दोन दुचाकीवर चार इसम संशयास्पद हालचाली करतांना आढळून आल्याने गस्ती पथकाने त्यांची तपासणी केली असता, आरोपीकडे  वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ मधील अनुसुची १ मधील भाग २ मध्ये सुचीबद्ध असलेले शिकार व विनापरवानगी वाहतुकीस प्रतीबंधीत असलेले ५ कासव प्रजातीचे वन्यजीव आढळले. त्यासोबत २२ खेकडे, २ दुचाकी, ३ टार्च व मासे पकडण्याची जाळी इत्यादी साहित्य मिळाले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

आरोपीवर भारतीय वन्यजीव संरक्षण अधीनियम १९७२ चे कलम ९, ३९, ४८, ४९, ४९ अ, व जैवविविधता अधीनियम २००२ मधील कलम ५६ नुसार वनगुन्हा क्रमांक ०८१०४/०८ नोंदविण्यात आला आहे. आरोपींना अहेरी येथील न्यायालयापुढे उभे केले असता त्यांना जामीन देण्यात आला.

या प्रकरणाचा पुढील तपास उपवनसंरक्षक राहुल सिंह टोलीया व उपविभागीय वनाधिकारी नितेश देवगडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरीक्षेत्राधिकारी योगेश शेरेकर करीत आहेत.

कासव हे पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या तपासणी नंतर, त्यांच्या नैसर्गिक अधीवासात सोडण्यात आले आहे.

ही कार्यवाही वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश शेरेकर, क्षेत्रसहाय्यक अनिल झाडे, प्रभाकर अनकरी, एम.आर. भोयर, प्रकाश राजुरकर, नियत वनरक्षक डि.एस. चिव्हाणे, बाळु मडावी, जांभुळे, मातने, कचलामी, राठोड, महेश खोबागडे व वाहन चालक विक्की कोडापे, वर्मा यांनी केली आहे.

कासव हे वन्यजीव असुन ते वनकायद्यातील अनुसुची मध्ये शेड्युल एक मध्ये सुचीबद्ध असल्याने त्यांची शिकार अथवा पकडल्यास वनकायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येतो. ज्यामध्ये ७ वर्षा पर्यंतची शिक्षा व एक लाखा रुपयापर्यंत दंड असल्याने कासवाची शिकार करू नये.

राहुल सिंह टोलीया – उपवनसंरक्षक, आलापल्ली वन विभाग

हे देखील वाचा : 

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी ‘जन-वन विकास’ योजने अंतर्गत कुक्कुटपालनासाठी तीनशे लाभार्थ्यांना वन विभागाने दिला लाभ

तू माझी नाही तर कुणाचीही नाही; लग्नास नकार दिल्याने प्रियकराने केली आपल्याच प्रियसीची हत्या!

कोरोनाच्या ओमीक्रॉन या नव्या व्हेरियंट मुळे यंदा ६ डिसेंबरला महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर गर्दी न करता घरूनच अभिवादन करावे -केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.