Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कौटुंबिक न्यायालय परिसरात पतीने पाडला पत्नीचा दात

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

पुणे डेस्क, दि. १ डिसेंबर : शिवाजीनगर येथील कौटुंबिक न्यायालयात एक दाम्पत्य घटस्फोटासाठी आले असता पत्नीने घटस्फोटास नकार दिल्याने पतीने पत्नीला तोंडावर मारल्यामुळे तिचा दात पडला. सदर घटना शिवाजीनगर येथील कौटुंबिक न्यायालयातील दुसऱ्या मजल्यावर असलेल्या समुपदेशन केंद्राच्या बाहेर  घडली आहे.

या गृहस्थाचे नाव सचिन विकास पवार (३४) असून लोहगाव येथील रहिवासी आहे. सदर गृहस्थाची पत्नी सोलापूर येथे राहते. तिने याबाबत फिर्याद दिली आहे. हे दोघे पती-पत्नी असून दोघेही विभक्त राहत आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

घटस्फोटाचा अर्ज दाखल केल्यानंतर समुपदेशनासाठी दोघे दि. २७ नोव्हेंबर रोजी शिवाजीनगर येथील कौटुंबिक न्यायालयात आले होते. यावेळी पतीने पत्नीला घटस्फोट देण्याविषयी सांगितले पण पत्नीने नकार दिला. याचा राग येऊन आरोपीने फिर्यादीच्या तोंडावर जोरात ठोसा मारला आणि फिर्यादीचा एक दात पडला. पत्नीचा खालचा अर्धा दात पाडून जखमी केल्याचा गुन्हा  सदर गृहस्थाविरुद्ध शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये  दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माने पुढील तपास करीत आहेत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

कासवाची शिकार करणाऱ्या चार आरोपींना अटक; वनविभागाची धडक कारवाई

तू माझी नाही तर कुणाचीही नाही; लग्नास नकार दिल्याने प्रियकराने केली आपल्याच प्रियसीची हत्या!

…आजही वन्यजीवाकरीता कायम वन्यजीव चिकित्सक नाही; वन प्रशासनाचे अजब धोरण…

 

 

Comments are closed.