Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली ब्रेकिंग : नक्षल्यांनी केली दोन ट्रक्टरची जाळपोळ ..

भामरागड तालुक्यातील कोटी पोलीस मदत केंद्र अंतर्गत येत असलेल्या मुरूमभशी गावाजवळील घटना.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली, दि. २७ नोव्हेंबर : भामरागड तालुक्यातील कोटी पोलीस मदत केंद्र अंतर्गत येत असलेल्या मरकणार ते मुरूमभुशीकडे जाणाऱ्या रस्त्याचे विकासकाम सुरु असतांना नक्षल्यांनी दोन ट्रक्टरची जाळपोळ केल्याची घटना घडली आहे.

१३ नोव्हेंबर रोजी गयारापत्ती मर्दिनटोला जंगल परिसरात झालेल्या पोलीस-नक्षल चकमकीत सेन्ट्रल कमिटी सदस्य मिलिंद तेलतुंबडेसह २७ नक्षल्यांचा पोलिसांनी खात्मा केला होता. त्याच पार्श्वभूमीवर तीन दिवसाआधी पत्रके टाकून २७ नोव्हेंबर रोजी बंद चे आवाहन केले होते. आणि त्याच दरम्यान पोलीस मदत केंद्र कोटी अंतर्गत मरकणार ते मुरूमभुशी रस्त्याचे विकासकाम कंत्राटदार अखिलेश मिश्रा यांच्या मार्फत काम सुरु असल्याने चवताळलेल्या नक्षल्यांनी दमदाटी करीत दोन ट्रक्टरला आग लावून जाळपोळ केली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सदर घटना उघडकीस आल्याने नक्षलग्रस्त भागात असलेल्या नागरिकांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून कोटी पोलिसांना माहिती प्राप्त होताच आज सकाळी घटनेस्थळी रवाना झाले असून अधिक तपास करीत असल्याची प्राथमिक माहिती सूत्राकडून प्राप्त झाली आहे.

हे देखील वाचा :

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

धक्कादायक!! एका अल्पवयीन आईने ४०दिवसांच्या चिमुरड्याची दोरीनं गळा आवळून केली हत्या!

धक्कादायक! एका शिक्षकानं शिकवणीसाठी येणाऱ्या अल्पवयीन मुलीला आपल्या वासनेचा बनवलं शिकार

शालेय विद्यार्थ्यांनी रॅली मार्फत मतदारांमध्ये मतदानविषयक केली जनजागृती

 

 

 

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.