Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्हयात वाढता कोरोना- आज 131 नवीन कोरोना बाधित तर 47 कोरोनामुक्त.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली 22 नोव्हें :- आज जिल्हयात 131 नवीन बाधित आढळून आले. तर आज 47 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 7456 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 6704 वर पोहचली. तसेच सद्या 677 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 75 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 89.91 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 9.08 टक्के तर मृत्यू दर 1.01 टक्के झाला.

नवीन 131 बाधितांमध्ये गडचिरोली 39, अहेरी 21, आरमोरी 25, भामरागड 3, चामोर्शी 15, धानोरा 5, एटापल्ली 2, कोरची 5, कुरखेडा 3, मुलचेरा 4, सिरोंचा 2 व वडसा येथील 7 जणांचा समावेश आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आज कोरोनामुक्त झालेल्या 47 रूग्णांमध्ये गडचिरोली 21, अहेरी 2, आरमोरी 2, भामरागड 3, चामोर्शी 2, धानोरा 2, एटापल्ली 1, मुलचेरा 2, सिरोंचा 2, कोरची 2, कुरखेडा 4 व वडसा मधील 4 जणाचा समावेश आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील पंचवटी नगर 2, मरुदेशवर हॉस्पिटलजवळ 1, कॅम्प एरिया 1, मेडिकल कॉलनी 1, कन्नमवार वार्ड 2, गोकुलनगर 3, शिवाजी कॉलेजजवळ 1, चामोर्शी रोड 1, झांसी राणी चौक 1, कारगील चौक 1, स्थानिक 2, पोर्ला 2, इंदिरानगर 3, साईनगर वार्ड 1, नंदनवननगर चामोर्शी रोड 2, चामोर्शी रोड 4, सायंश कॉलेजच्या मागे 1, रामटेके डुप्लेक्स 1, गणेशनगर 1, शांतीनगर 1, गुलमोहर कॉलनी 1, आठवडीबाजाराजवळ 1, कोनसरी 2, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये नागेपल्ली 3, आलापल्ली 9, स्थानिक 5, गुड्डीबुडम 1, कोडीगांव 1, चिंचगुंडी 1, टेकाडी 1, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 25, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये पी.एस. 2, केजीबीव्ही स्कुलजवळ 1, चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये आष्टी 2, दुर्गापुर 1, आर डी शाळेजवळ 1, गुंडापल्ली 1, स्थानिक 3, आमगाव 1, रेगडी 1, आंबेडकर चौक राम मंदिर जवळ आष्टी 2, घोट 1, धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये घाटगाव 1, रांगी 1, मलाड 1, स्थानिक 1, चातगांव 1, एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, जांभिया 1, कोरची तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 5, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये रामगड 2, मालेवाडा 1, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये खुदीरामपल्ली 1, सुंदरनगर 1, विजयनगर 1, श्रीनगर 1, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये झिंगानुर 1, टेकाडा मोटला 1, तसेच वडसा तालुक्यातील बाधितामध्ये कस्तुरबा वार्ड 1, विसोरा 1, कमलेश उके शाळेजवळ 1, सावंगी 1, दहेगाव 1, चोप 1, रणभुमी 1, असा समावेश आहे. तर इतर जिल्ह्यातील बाधितामध्ये 2 जणाचा समावेश आहे.

Comments are closed.