Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ड्रग्ज प्रकरणी- भारती आणि हर्ष लिंबाचियाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी.

न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर दोघांनीही जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे, सोमवार सुनावणी केली जाणार आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क २२ नोव्हें :- ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी एनसीबी अधिकाऱ्यांनी भारती सिंग हिच्या घरी धाड टाकली असता, तिच्या घरी 86.5 ग्राम गांजा सापडला. भारती सिंग आणि तिचा नवरा हर्ष लिंबाचीया या दोघांनीही ते गांजा घेत असल्याची कबुली दिली आहे. यानंतर भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचीया एनडीपीएस कायद्यानुसार अटक करण्यात आली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कॉमेडियन भारती आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया या दोघांनाही मुंबईच्या किल्ला कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे दोघांसमोरही जामीनासाठी अर्ज करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दोघांनीही जामीनासाठी अर्ज केलेला आहे. आता दोघांच्याही जामीन अर्जावर उद्या (सोमवार) सुनावणी केली जाणार आहे. भारती आणि हर्ष यांच्यासोबतच इतर दोन ड्रग्ज पेडलर्सनाही कोर्टासमोर हजर करण्यात आलं असून दोघांनाही पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Comments are closed.