Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गोंडवाना विद्यापीठाकडून गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अपर्ण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, दि. ९ फेब्रुवारी : गोंडवाना विद्यापीठाकडून गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या श्रद्धांजलीचा कार्यक्रम गोंडवाना विद्यापीठाच्या सभागृहात सोमवारी दि. ७ फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास पार पाडण्यात आला. यावेळी दोन मिनिटे मौन पाळून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

याप्रसंगी कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या. ते म्हणाले, सलग सहा दशकांपेक्षा जास्त काळ गात राहणं हा चमत्कार असून तो लता मंगेशकर यांच्या रूपाने प्रत्ययाला आला. काळ बदलला, श्रोत्यांच्या तर अनेक पिढ्या बदलल्या मात्र युटुब आणि मोबाईल ॲप्सच्या युगातल्या आजच्या तरुणाईवरही लतादीदींच्या आवाजाचे गारूड कायम आहे. त्यांचा स्वर कालातीत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आज जरी त्या आपल्यात नसल्या, तरी त्यांच्या अमिट स्वराने नाद विश्व व्यापलं आहे. वयाच्या तेराव्या वर्षी लतादीदींनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि तेव्हापासून आजतागायत आपला सुमधुर आवाज त्या भारतीय चित्रपटाला देत आल्या. त्यांनी आपलं विश्व शून्यातून निर्माण केले आहे.

ते पुढे म्हणाले, गाणं म्हणजे त्यांच्यासाठी साधना होती, त्यांनी मराठी संगीताला आनंदघन या टोपन नावाने संगीत दिलयं, त्यांच्या तोडीची दुसरी गायिका होणे शक्य नाही. बडे गुलाम अली साहेबांचे मी वाचलेले एक पुस्तक आहे. त्यात लतादीदींच्या आवाजाविषयी उल्लेख आहे, ते म्हणतात, कंबख्त कभी बेसुरी नही होती.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

यावरून आपण विचार करू शकतो की, त्यांचा आवाज हा कुठल्या तोडीचा आहे. अतिशय खडतर परिस्थितीत त्या पुढे आल्या. त्यांनी अगदी भजनांपासून ते लोरी पर्यंतची गाणी गायली आहेत. ९३ वर्षांचे आयुष्य त्या भरभरून जगल्या. त्यांच्या गाण्यांची सुरुवात भक्ती गीतापासून झाली आणि शेवटचं गाणं देखील भक्तिगीतच होतं.

श्रद्धांजली च्या या कार्यक्रमाला विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, डॉ. अनिल झेड. चिताडे, विज्ञान व तंत्रज्ञान अधिष्ठाता डॉ.सुरेश रेवतकर, विद्यापीठातील सर्व अधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचारी उपस्थित होते.  संचालन आणि आभार प्रा. डॉ. विवेक जोशी यांनी मानले.

हे देखील वाचा  : 

धक्कादायक! एक लाख रुपयांसाठी आईनेच विकले पोटच्या मुलाला  

धक्कादायक! चारित्र्याच्या संशयातून पत्नीवर धारदार शस्त्राने सपासप वार! पतीविरोधात गुन्हा दाखल

धनंजय मुंडे यांचा लग्नामध्ये भन्नाट डान्स; विडिओ तुफान व्हायरल  

 

Comments are closed.