Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

लोखंडी सळाखीने वार करून पत्नी ला संपविले. कोरची तालुक्यातील देऊळभट्टी येथील घटना.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली दि 05 सप्टेंबर : कोरची तालुक्यापासून
35 किमी अंतरावर असलेल्या देऊळभट्टी येथे आज सकाळी 8.30 च्या सुमारास ह्रदय हेलावणारी घटना घडली. देऊळभट्टी येथील एका इसमाने आपल्याच बायकोच्या डोक्यावर, शरीरावर सळाखीने सपासप वार करून गंभीर जखमी केले.त्रीपुरारी बंजारे (35) असे आरोपी नवऱ्याचे नाव असून मंगेश्वरी (30) असे मयत पत्नी चे नाव आहे.

त्रीपुरारी बंजारे हा मुळ राजनांदगांव जिल्ह्यातील करमतरा येथील रहिवासी आहे. त्रीपुरारी हा मानसिक रोगी आहे. त्यामुळे त्याला एखाद्या वैद्याकडे दाखवून उपचार करण्याच्या उद्देशाने त्यांनी आपल्या घरी काही दिवसांपूर्वी आणले होते.

आज सकाळी 8.30 च्या दरम्यान मंगेश्वरी जेवण करीत असताना त्रीपुरारीने लोखंडी सळाखीने पत्नीच्या डोक्यावर व शरीरावर सपासप वार करून गंभीर जखमी केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मंगेश्वरीला जवळच्या कोटगुल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले. त्यावेळी स्थानिक डाँक्टरनी मंगेश्वरीची गंभीर अवस्था पाहून ग्रामीण रुग्णालय कोरची येथे तात्काळ हलविण्यात आले .मात्र ग्रामीण रुग्णालयात कोरचीत दाखल करताच तपासांअती डाँ,इटनकर यांनी मंगेश्वरीला म्रूत घोषित केले.

या दांपत्याला एक पाच वर्षाचा मुलगा आणि तीन वर्षाची मुलगी आहे. सदर घटनेची माहिती ग्रामीण रुग्णालय  येथील डॉक्टरांनी पोलीस स्टेशनला दिली असून अधिक तपास सुरू आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा,

कोरची ग्रामीण रुग्णालयात सदोष विद्युत जोडणीमुळे नेहमी होते राहते खंडीत,अतिआवश्यक वेळीच सुरू केले जाते जनरेटर!

https://loksparsh.com/maharashtra/loksparsh-exclusive-gadchiroli-forest-ranger-dr-to-seize-the-tiger-that-killed-eleven-people-orders-given-by-kishore-mankar/20546/

बेतकाठी येथील बंद असलेली दूरसंचार सेवा पूर्ववत सुरू करा, सरपंच कुंतीबाई हुपुंडी यांची मागणी..

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.