Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

धक्कादायक! तरुण प्राध्यापकाची गळफास घेऊन आत्महत्या…

पत्नी आणि सासऱ्यांची सतत शिवीगाळ व मारहाणीला कंटाळून नांदेड शहरातील राजेश नगर भागात एका तरुण प्राध्यापकाने घेतला गळफास.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

नांदेड, दि. १८ फेब्रुवारी : पत्नीच्या आणि सासरच्यांनी सतत शिवीगाळ, मारहाणीला कंटाळून एका तरुण प्राध्यपकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नांदेड शहरातील राजेश नगर भागात घडली आहे. या प्रकरणात भाग्यनगर पोलिसांनी मयताच्या पत्नीसह सासरच्या मंडळीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नांदेड शहरातील राजेशनगर येथील प्रा. संदीपान रामकिशन खंदारे असे मयताचे नाव आहे. उमरखेड तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील शिवाजी शिक्षण संस्थेवर ते सहशिक्षक होते. २०१९ मध्ये उमरखेड येथील स्नेहल अनंतराव गायकवाड यांच्याशी संदीपान यांचा विवाह झाला होता. विवाहानंतर एक महिना सर्व सुरळीत होते; परंतु त्यानंतर आई वडिलांसोबत राहायचे नाही म्हणून मयताची पत्नी स्नेहल ही वाद घालत होती. तसेच मारहाण करीत होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

त्यामुळे संदीपान हे उमरखेड येथे राहण्यासाठी गेले होते. या ठिकाणी पत्नी स्नेहल अनंतराव गायकवाड, प्रथमेश गायकवाड, नम्रता गायकवाड हे संदीपान यांना अनेकवेळा शिवीगाळ करून मारहाण करत होते.याबाबत संदीपान यांनी अनेक वेळा बहिणीला सांगितले होते.

असह्य झाल्याने संदीपान यांनी १५ फेब्रुवारी रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी त्यांनी रजिस्टरमध्ये आपल्याला होत असलेल्या त्रासाबद्दल लिहून ठेवले आहे. या प्रकरणात भाग्यनगर पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्य मार्गदर्शक सुचना जारी

विजाभज प्रवर्गासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

तृतीयपंथी समुदायाचे कल्याणकरीता नोंदणी अभियान

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.