Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

विजाभज प्रवर्गासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, दि.18 फेब्रुवारी : दिनांक 08 मार्च,2019 नुसार ग्रामीण भागात वि.जा.भ.ज. प्रवर्गासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत घरकूलाचा वैयक्तिक लाभ योजना राबविण्यात येते. या योजनेच्या अटी व शर्ती पुढील प्रमाणे आहेत.
आवश्यक कागदपत्रे लाभार्थी हा विजाभज प्रवर्गाचा असावा.(सक्षम प्राधिकाऱ्यांनी दिलेले जात प्रमाणपत्र जोडावे.) लाभार्थी कुटूंबाचे वार्षीक उत्पन्न रु. 1.20 लक्ष पेक्षा कमी असावे.(सक्षम प्राधिकाऱ्यांनी दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र जोडावे.), लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. (त्यासंबंधाने अधिवास प्रमाणपत्र जोडावे.), लाभार्थ्यांच्या स्वमालकीची जागा असावी. (त्यासंबंधाने जागा मालकीचा सक्षम पुरावा जोडावा), लाभार्थी कुटूंब झोपडीकच्चे घर पालामध्ये राहणारा असावा.( घराच्या सद्यस्थितीचे स्पष्ट वर्णन असलेला नमुना 8 अ जोडावा.), लाभार्थी कुटूंबाने यापूर्वी शासनाच्या अन्य घरकूल योजनेचा लाभ घेतलेला नसावा. यासाठी ग्रामपंचायत सचिवांचे प्रमाणपत्र जोडण्यात यावे. लाभार्थी कुटूंब भुमिहिन असावे. (तलाठ्याचा भुमिहिन असल्याचा दाखला जोडावा.) घराच्यासद्यस्थितीचे छायाचित्र ( फोटो) जोडावा. लाभार्थ्यांचे रेशनकार्ड जोडावे. लाभार्थ्यांचे आधारकार्ड जोडावे.
विद्युत देयकाची छायाप्रत जोडावी.

प्राधान्यक्रम : पालात राहणारे. (गावोगावी भटकंती करुन उपजिवीका करणारा), दारिद्रय रेषेखालील कुटूंब, घरात कोणही कमावत नाही अशा विधवा, परितक्त्या किंवा अंपग महिला, पूरग्रस्त,वरील कागदपत्रांची पुर्तता करीत असलेल्या पात्र लाभार्थ्यांनी ग्रामपंचायत व पंचायत समिती कार्यालयाशी संपर्क साधावा. असे सहायक आयुक्त,समाज कल्याण, गडचिरोली यांनी कळविले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा : 

तृतीयपंथी समुदायाचे कल्याणकरीता नोंदणी अभियान

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

अबब! प्रियसी साठी चोरल्या तब्बल १५ दुचाक्या; दुचाकी चोरून पुरवीत होते प्रियसी चे लाड

 

Comments are closed.