Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

धावत्या 108 रुग्णवाहिकेचं चाक निखळले…BVG चा भोंगळ कारभार रुग्णांच्या जीवावर बेततोय..

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गोंदिया, दि. २८ ऑगस्ट : गोंदिया जिल्ह्यातल्या गोरेगाव तालुक्यातील तुमखेडा येथे एका धावत्या 108 रुग्णवाहिकेचे चाक अचानक निखळून पडल्याने भीषण अपघात झाला. या रुग्ण वाहिकेत एक ऑक्सिजन लावलेला रुग्ण आणि डॉक्टरसह इतर इतर चार जण बसलेले होते. सुदैवाने या अपघात कोणतीही जीवित हानी झालेली. परंतु या अपघातने मात्र राज्यभर 108 रुग्ण वाहिका सेवेचं व्यावस्थामन करणाऱ्या BVG कंपनीच्या गलथान कारभारामुळे नागरिकांच्य जीवाशी खेळ होतोय अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून येत आहेत.

गोंदियाच्या शासकिय महाविद्यालयातुन 62 वर्षीय जनिराम कांबळे या रुग्णाला 108 रुग्णवाहिकेने नागपुर येथील मेडिकल कॉलेज येथे पुढील उपचारासाठी घेवुन जात होते. या दरम्‍यान गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यातील तुमखेडा येथे धावत्या रुग्णवाहिकेचे अचानक मागचे चाक निखळले. त्यामुळे अपघातानंतर रुग्णवाहिका तब्बल 100 मिटरपर्यंत तिन चाकावर फरफटत गेली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या रुग्ण वाहिकेत जनिराम कांबळे हे रुग्ण 62 वर्षीय रुग्ण ऑक्सिजन लावलेल्या स्थितीत.तसेच इतर चार लोक, एक चालक व एक डॉक्टर उपस्थित होते. त्यामुळे नशीब बलवत्तर म्हणून या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान अपघातानंतर साधारण एका तासानंतर दुसरी रुग्णवाहीका बोलून रुग्णाला नागपूरला पाठविण्यात आले आहे.

विशेष म्हणजे BVG कडून राज्यभरात रुग्ण सेवेसाठी 108 नंबरने चालणाऱ्या रुग्ण वाहिकांची देखभाल दुरुस्ती व्यवस्थित केली जात नसल्यामुळे असे अपघात वाढत आहे असे आरोप नागरिकांकडून होत आहेत. त्यामुळे या अपघातामुळे पुन्हा एकदा BVG कंपनीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

शिंदे गट दसरा मेळावा हायजॅक करणार?

क्रीडापटूची सतर्कतेमुळे फसवणूक टळली; अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल

शासन जनतेसाठी आहे, त्यांना त्रास व्हायला नको : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.