Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

युक्रेनमध्ये गडचिरोलीच्या दोन विद्यार्थिनी अडकल्या

 लोकस्पर्श न्यूज नेटवर्क ,

गडचिरोली दि,२५ फेब्रुवारी : रशियाने युक्रेनविरुद्ध युद्ध पुकारले असताना गडचिरोली शहरातील  वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या  दोन  विद्यार्थिनी युक्रेनमधील एका शहरात अडकल्या असल्याने  पालक चिंताग्रस्त झाले आहेत. दिव्यानी सुरेश बांबोळकर आणि स्मृती रमेश सोनटक्के अशी गडचिरोली शहरातील या विद्यार्थिनींची नावे आहेत.

दोघीही युक्रेनची राजधानी कीव्ह शहरापासून सुमारे अडीचशे किलोमीटर अंतरावरील व्हिनित्सिया येथील व्हिनित्सिया नॅशनल युनिव्हर्सिटीत एमबीबीएसचे शिक्षण घेत आहेत. दिव्यानी ही एमबीबीएस च्या तिसऱ्या वर्षाला, तर स्मृती प्रथम वर्षाला आहे. दिव्यानी ही आपल्या मैत्रिणींसह व्हिनित्सिया शहरातील एका भाड्याच्या खोलीत राहते, तर स्मृती ही वसतिगृहात राहत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या शहरात तेवढी भीषण परिस्थिती नाही. परंतु गेल्या काही दिवसांपासून युक्रेनवर युद्धाचे सावट असल्याने स्मृती सोनटक्के हिने ४ मार्चच्या विमानाचे तिकिट काढले होते. मात्र युद्ध सुरु झाल्याने सर्व विमाने बंद आहेत. अशातच काल(ता.२४) विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी युक्रेनमध्ये नेणाऱ्या कंत्राटदाराने भोजन व अन्य जीवनावश्यक वस्तूंची साठवणूक करुन ठेवण्याचा निरोप या विद्यार्थिनींना दिला.

त्यानुसार त्यांनी सर्व वस्तूंची जमवाजमव करुन ठेवली आहे. परंतु परिस्थिती आणखी चिघळत असल्याने आणि विमाने बंद असल्याने वसतिगृहातील सर्व विद्यार्थी भयभीत झाले आहेत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

यासंदर्भात विद्यार्थी आणि त्यांचे कंत्राटदार भारतीय दुतावासाच्या संपर्कात असल्याची माहिती प्रा.रमेश सोनटक्के यांनी दिली. दोन्ही विद्यार्थिनी सुरक्षित असल्या, तरी युद्धामुळे पालक चिंताग्रस्त झाले आहेत.

हे देखील वाचा ,

केंद्रीय राखीव पोलीस बल  क्रमांक ३७ वाहिनीद्वारे सिविक एक्शन कार्यक्रमाअंतर्गत अतिदुर्गम भागात विविध जीवनावश्यक वस्तुंचे वाटप.

राष्ट्रवादी कॉग्रेस तर्फे धरणे आंदोलन करून मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेचा निषेध.

Comments are closed.