Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राष्ट्रवादी कॉग्रेस तर्फे धरणे आंदोलन करून मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेचा निषेध.

अहेरीत केंद्र सरकार आणि ईडीच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली २४ फेब्रुवारी: राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी तर्फे  अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक(NAWAB MALLCK )यांच्या अटकेच्या निषेधार्थ आज गुरुवारी अहेरी येथिल गांधी चौकात धरणे आंदोलन करून केंद्र सरकार आणि ईडीच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली .आंदोलनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (UDDHHAV THACKREY)यांना अहेरीचे तहसीलदार यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.

राज्य मंत्रिमंडळाचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना काल पहाटे पाच वाजता च्या सुमारास केंद्रीय संस्था ईडी ने अटक केली होती .

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या धरणे आंदोलना चे नेतृत्व जिल्हा परिषद सदस्या तथा राष्ट्रवादी युवती काँग्रेस जिल्हाअध्यक्ष भाग्यश्री आत्राम हलगेकर,राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या जिल्हाध्यक्ष शाहीन हकीम,राष्ट्रवादी अहेरी तालुका अध्यक्ष श्रीनिवास वीरगोनवार,नगरसेवक अमोल मुक्कावार,राष्ट्रवादी महिला काँग्रेस तालुका अध्यक्ष सारिका गडपल्लीवार यांनी केले.

केंद्र सरकार महाविकास आघाडी सरकारच्या विकास कामांना आळा घालण्यासाठी खोटे आरोप करून व आपल्या सत्तेचा गैरवापर करून ईडी चा वापर करून नवाब मलिक यांना अटक केली आहे.मात्र आम्ही व राष्ट्रवादी पक्ष नवाब मलीक यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असून दिल्लीच्या तख्ता पुढे महाराष्ट्र कधी झुकला नाही आणि झुकणार ही नाही असे आंदोलकांनी म्हंटले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

केंद्र सरकारच्या इशाऱ्यावरून ईडी ने केलेल्या कारवाईचा आम्ही जाहीर निषेध करतो असेही म्हणत आंदोलकांनी प्रचंड नारेबाजी केली.

या आंदोलनात आलापल्ली ग्राम पंचायत चे सदस्य स्वप्नील श्रीरामवार,राष्ट्रवादी महिला काँग्रेस अहेरी तालुका अध्यक्ष सारिका गडपल्लीवार,ज्येष्ठ कार्यकर्ते बुधाजी सिडाम,लक्षण येर्रावार,कैलास कोरेत,इरफान शेख,नफि पठाण,ताजु कुडमेथे,अलिम शेख,जावेद शेख सह इतर महिला व पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते.

हे देखील वाचा :

नवाब मलिकांचा मंत्रिपदाचा राजीनामा न घेण्याचा शरद पवारांचा मोठा निर्णय; नवाब मलिकांच्या पाठिशी राष्ट्रवादी ठाम

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.