Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नक्षलवाद्यांनी जंगल परिसरात लपवून ठेवलेला शस्त्र, स्फोटकांचा मोठा साठा शोधून काढण्यात पोलीस जवानांना मोठे यश

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली : २४ फेब्रुवारी, नक्षलविरोधी अभियानाचे  विशेष अभियान पथक व बी.डी.डी.एस. पथकाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना नक्षलवाद्यांनी गोपनियरित्या जंगलपरिसरात लपवून ठेवलेला शस्त्र, स्फोटकांचा साठा शोधून काढण्यात जवानांना खुप मोठे यश आले आहे. हि कारवाई कुरखेडा उपविभागाअतर्गत येत असलेल्या जामटोला, बंजारी रिठ जंगल परिसरात करण्यात आली .

पोलिसांनी या कारवाईत १ नग जिवंत कुकर बॉम्ब व ०४ नग कुकर असे एकुण ०५ कुकर, जिवंत डेटोनेटर ०१ नग, जिलेटीन (जेली) ०४ नग, स्प्रिन्टर लोखंडी तुकडे ०६ नग, गन पावडर ४५ ग्रॅम मोबाईल चार्जर स्विच ०१ नग, तुटलेला मोबाईल चार्जर ०१ नग, नक्षल शर्ट ०१ नग, नक्षल पॅन्ट ०१ नग व नक्षल पुस्तके तसेच इतर साहित्य मोठ्या प्रमाणात हस्तगत करण्यात आले आहे. यापैकी जिवंत कुकर बॉम्ब हे बीडीडिएस पथकाच्या मदतीने अत्यंत सतर्कतेने यशस्वीरित्या जागेवरच नष्ट करण्यात आले असून इतर साहीत्य गडचिरोली येथे आणण्यात आलेले आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई सुरु आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जिल्हयामध्ये नक्षल घातपाती हिंसक कारवाया करण्यासाठी विविध प्रकारच्या शस्त्र व स्फोटक साहीत्याचा वापर करतात, असे साहित्य ते मोठया प्रमाणात खरेदी करुन ठेवतात व जंगल परिसरातील जमिनीत गोपनियरित्या पुरुन ठेवतात. तसेच काही ठिकाणी रस्ते तसेच सुरक्षा दलांना धोका होवू शकेल अशा इतर ठिकाणी स्फोटके, शस्त्र साहित्य व दारुगोळा इत्यादी ते गोपनियरित्या जमिनीत पुरुन ठेवतात.

टिसीओसी सप्ताहाच्या पार्श्वभुमीवर सदर डंप हस्तगत केल्यामुळे या भागात नक्षलवादयांना मोठा हादरा बसलेला आहे. त्यामुळे नक्षल्याचे लक्षात आलेले आहे की, गडचिरोली पोलीस दलाची नजर नक्षल्यांवर असुन सामान्य नागरीकांना वेठीस धरुन बळजबरीने टिसीओसी सप्ताह पाळावयास भाग पाडणे नक्षलवादयांना आता अडचणीचे ठरणार आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सदर कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी अभियानात सहभागी असलेल्या विशेष अभियान पथक व बीडीडीएस पथकाचे कौतुक केले आहे. तसेच जिल्हाभरात नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आल्याचे सांगितले.

Comments are closed.