Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सराफा व्यापाऱ्यावर पाेलिस कोठडीत ‘अनैसर्गिक लैंगिक’ अत्याचार…

अकोला LCB पोलिस अधिकाऱ्यांवर आरोप…

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

अकोला : अकोला स्थानिक गुन्हे शाखेत एका सराफा व्यापाऱ्यावर अनैसर्गिक लैगिक अत्याचार झाल्याचे पिडीत सराफा व्यापाऱ्याचे म्हणणे असून या प्रकरणी पिडीत आरोपीने पोलिसात तक्रार दाखल केली असून सहायक पोलिस निरीक्षकास तसेच पोलिस कर्मचाऱ्यास रात्री उशिरा मुख्यालयी अटक करण्यात आली आहे.

खाकीला बदनाम करणारी घटना ९ जानेवारीला अकोला स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरिक्षक नितीन चव्हाण आणि शिपाई शक्ती कांबळे यांनी चोरीचे सोने खरेदी प्रकरणी शेगावतील प्रसिद्ध सराफा व्यावसायिकला रात्री 3 वाजता शेगावातून अटक केली होतीय. शेगावातून अकोल्यात आणतांना गाडीतच आरोपीला प्रचंड मारहाण करण्यात आली. रविवारी आरोपीला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती. या दोन दिवसांत आरोपी सराफा व्यापाऱ्याला एपीआय चव्हाण आणि काँस्टेबल कांबळे याने उलटे करून मारहाण केलीय.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सराफा व्यापाऱ्याला उलटं टांगलेलं असतांना सोने चोरी प्रकरणात आधीच अटकेत असलेल्या दोन्ही आरोपींना वर्मांच्या समोर आणण्यात आलंय. यावेळी दोघांनाही त्याच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याचे आरोपी सराफा व्यापारी यांचे म्हणणे आहे. यानंतर पायावर जास्त मारहाण झाल्याने पायावर व्रण दिसत होते. गरम पाण्याने व्रण मिटावेत म्हणून व्यापाऱ्याच्या पायावर गरम पाणी म्हणून उकळतं पाणी टाकण्यात आलंय. यामूळे व्यापाऱ्याचा पाय गंभीररित्या भाजल्या गेलाय. आपली चुक झाकण्यासाठी पोलिसांनी व्यापाऱ्याला घरीच पाणी सांडलं हे सांगण्यासाठी दबाव टाकलाय. यावेळी तोंड उघडलं तर एनकाऊंटर करण्याची धमकी पोलिसांनी त्याला दिलीय. काल या प्रकरणात त्याला जामीन मिळालाय.

जामिनानंतर हादरलेल्या व्यापाऱ्याने आपबिती कुटूंबियांना सांगितलीय. काल व्यापाऱ्याच्या जळालेल्या पायावर अकोल्यातील एका खाजगी रूग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आलीये. आरोपी व्यापाऱ्याने अकोला पोलीस अधिक्षक आणि सिटी कोतवाली पोलिसांत याप्रकरणी तक्रार दाखल केलीय. यात पोलिसांनी सध्या कोणताही गुन्हा दाखल केला नसून त्यांनी यावर चुप्पी साधलीय. तर सध्या आरोपीचे कुटूंबिय सध्या यावर काहीच बोलण्याच्या मनस्थितीत नाहीये. तक्रारीत त्यांनी आत्महत्येचा विचार मनात येत असल्याचं म्हटलंय.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सध्या या प्रकरणात शहर उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्याकडे चौकशी सोपवली आहे. चौकशी सुरू असेपर्यंत सहायक पोलिस निरीक्षक व पोलिस कर्मचारी यांना एलसीबीतून कंट्रोलरूमला संलग्न केले आहे….!

हे देखील वाचा : 

वाघाची शिकार करणाऱ्या ६ आरोपींवर गुन्ह्याची नोंंद : वनविभागाची कठोर कारवाई

हिंगणघाट जळीतकांड प्रकरणाचा ५ फेब्रुवारीला लागणार निकाल

स्फोटात दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू; वेल्डींग करतांना कंपनीत झाला भीषण स्फोट

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.