Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस होत आहे वाढ; नवे 284 कोरोनाबाधित तर 119 कोरोनामुक्त

कोरोना संसंर्गाचे काटेकोर नियमाचे पालन करून आरोग्याची खबरदारी घेण्याचे जिल्हा प्रशासनाने केले आवाहन.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, दि. 22 जानेवारी : गडचिरोली जिल्हयात आज 1017 कोरोना तपासण्यांपैकी 284 नवीन कोरोना बाधित आढळले असून तब्बल 119 जणांनी कोरोनावर मात केली. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 32876 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 30871 आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 1253 झाली आहे.

आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 752 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामुळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.90 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 3.81 टक्के तर मृत्यू दर 2.29 टक्के झाला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आज नवीन 284 बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील 139,अहेरी तालुक्यातील 12,आरमोरी तालुक्यातील 15, भामरागड तालुक्यातील 03, चामोर्शी तालुक्यातील 38, धानोरा तालुक्यातील 13, एटापल्ली तालुक्यातील 04, मुलचेरा तालुक्यातील 24, कोरची तालुक्यातील 03, कुरखेडा तालुक्यातील 14,सिरोंचा तालुक्यातील 13, आणि वडसा तालुक्यातील 06 जणाचा समावेश आहे.

तर आज कोरोनामुक्त झालेल्या 119 रुग्णामध्ये गडचिरोली तालुक्यातील 64, अहेरी तालुक्यातील 06, आरमोरी तालुक्यातील 02, भामरागड तालुक्यातील 07, चामोर्शी तालुक्यातील 05, धानोरा तालुक्यातील 04, एटापल्ली तालुक्यातील 01, सिरोंचा तालुक्यातील 02, कोरची तालुक्यातील 04,मुलचेरा तालुक्यातील 02, कुरखेडा तालुक्यातील 01,आणि वडसा तालुक्यातील 21 जणाचा समावेश आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

वाघाची शिकार करणाऱ्या ६ आरोपींवर गुन्ह्याची नोंंद : वनविभागाची कठोर कारवाई

सराफा व्यापाऱ्यावर पाेलिस कोठडीत ‘अनैसर्गिक लैंगिक’ अत्याचार…

Comments are closed.