Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वाघाची शिकार करणाऱ्या ६ आरोपींवर गुन्ह्याची नोंंद : वनविभागाची कठोर कारवाई

आरोपी विरूध्द वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ चे कलामन्वये गुन्हा नोद.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गोंदिया :  जिल्ह्यात अर्जुनी मोरगाव वनपरिक्षेत्रातील रामघाट बीटातील कक्ष क्र. २५४-बी मध्ये दि. १३ जानेवारी रोजी जिवंत विद्युत तारेच्या सहाय्याने वाघाची शिकार केल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी वनविभागाने ६ अरोपिना अटक केली असून त्यांच्या कडून वाघाचे २ सुळे दात, वाघाच्या जबड्याची हाडे, इतर लहान दात व वाघाच्या अवयवांचे तुकडे करणारे साहित्य ही जप्त करण्यात वनविभागाला यश प्राप्त झाले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

प्राप्त माहितनुसार, गोंदिया वनक्षेत्रातील अर्जुनी मोरगाव येथे १३ जानेवारी रोजी रामघाट बिट भाग १, वन कक्ष क्रमांक २५४ बी मध्ये एक वाघ मृताअवस्थेत आढळलेला होता. सदर प्रकरणात २० जानेवारी रोजी आरोपींकडुन वाघ शिकार प्रकरणात लपवुन ठेवलेले २ सुळे दात, वाघाच्या जबड्याची हाडे, इतर लहान दात व गुन्ह्यात वाघाच्या अवयवांचे तुकडे करण्यासाठी आरोपींनी वापरलेली कु-हाड वनविभागाने आरोपींकडुन जप्त केली.

सदर प्रकरणामध्ये १७ जानेवारी ला ५ आरोपींना अटक करून अर्जुनी मोरगाव येथील न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने २१ रोजी पर्यंत सर्व आरोपींना वनकोठडी मंजुर केली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

प्रकरणात चौकशी दरम्यान २० जानेवारी रोजी आणखी एक आरोपीस अटक करून अर्जुनी मोरगाव न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने २१ जानेवारी पर्यंत वनकोठडी सुनावण्यात आली होती.

आरोपी धनराज शिवा चचाने व झानेश्वर मधुकर वाघाडे यांनी ११ जानेवारी रोजी सायंकाळी ७ ते ८ वाजेच्या दरम्यान डॉ. उल्हास गाळेगोणे यांच्या खाजगी शेतातील विद्युत पंपाच्या विज पुरवठा मिटर मधुन विद्युत प्रवाह चोरी करून वायरच्या माध्यमातुन घेतला. सदर विद्युत प्रवाह लोखंडी तारेच्या सहाय्याने शेतात व जंगलात पसरविला, सदरील विद्युत प्रवाह सुमारे दिड कि.मी. अंतरापर्यंत मोकळ्या तारेतुन जमिनीवरून सुमारे दोन फुट उंचीवरून जंगलात नेला होता.

सदर विज प्रवाहीत तारेस स्पर्श होउन वाघाचा मृत्यु ११ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास झाला. १२ जानेवारी रोजी पहाटे ५ वाजता आरोपी धनराज शिवा चचाने व ज्ञानेश्वर मधुकर वाघाडे यांनी मृत वाघाचे दोन सुळे दात, मिशा कापुन सोबत नेले व कु-हाड स्वत:च्या शेतात विहिरी जवळ लपवुन ठेवले. अद्याप लोखंडी तारेचा शोध घेणे बाकी आहे.

सदर वनगुन्ह्यातील आरोपी यांनी विज प्रवाह संपुर्ण रात्र सायं. ७ वाजता पासुन सकाळी ५ वाजता पर्यंत तारेतुन प्रवाहीत केला होता. सदर तारेस स्पर्श होउन मनुष्यहानी व इतर हानी होण्याची सुध्दा दाट शक्यता होती. या प्रकरणात वन गुन्ह्यात सहभागी आरोपी धनराज शिवा चचाने, ज्ञानेश्वर मधुकर वाघाडे, शरद पांडुरंग मळकाम, विकास गोपाल नेवारे, विलास रामदास सिखरामे, धनपाल माधो कांबळे या सर्व आरोपी विरूध्द वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ चे कलामन्वये गुन्हा नोद करून कार्यवाही करण्यात आली आहे.

हे देखील वाचा : 

नक्षल्यांनी रस्त्याचे बांधकाम करत असलेल्या वाहनाची केली जाळपोळ…

हिंगणघाट जळीतकांड प्रकरणाचा ५ फेब्रुवारीला लागणार निकाल

स्फोटात दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू; वेल्डींग करतांना कंपनीत झाला भीषण स्फोट

 

Comments are closed.