Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वारे पठ्या!! शाबास ! कुस्तीत भारताचा बजरंग पुनिया उपांत्य फेरीत

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

वृत्तसंस्था:६ ऑगस्ट, टोकियो ऑलिम्पिक २०२०(tokyo olympic2020)  मध्ये भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनियाने (bajrang puniya) देशाची मान उंचावली आहे. शुक्रवारी (६ ऑगस्ट) पुरुषांच्या फ्रीस्टाईल ६५ किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व सामन्यात बजरंगने इराणच्या मोर्तेझा चेका घियासीला धोबीपछाड देत २-१ ने विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.त्यामुळे कुस्तीत भारताला पुन्हा एका पदकाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

 

पहिल्या राऊंडमध्ये बजरंगला तांत्रिक आधारे मोर्तेझाकडून एक पेनल्टी गमावून ०-१ ने पिछाडीवर राहावे लागले. त्यामुळे त्याच्यासमोर सामन्यात पुनरामगन करण्याचे आव्हान होते. मात्र, मोर्तेझाने त्याला संधीच दिली नाही आणि पहिला राऊंड राऊंड आपल्या नावावर केला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

यानंतर दुसऱ्या राऊंडमध्येही तो बचावात्मक खेळ करत होता. तर इराणचा मोर्तेझा सातत्याने आक्रमक खेळ करत होता. तरीही बजरंगही त्याला दाव लावण्याची संधी देत नव्हता. मात्र, जेव्हा दुसऱ्यांदा पेनल्टी गुण गमावण्यापासून वाचण्यासाठी ३० सेकंदाचा वेळ दिला, तेव्हा बजरंगला आक्रमक व्हावे लागले.

बजरंगचा पाय पकडून त्याला अडकवण्याच्या प्रयत्नात इराणचा मोर्तेझा स्वत:च बजरंगच्या तावडीत सापडला. बजरंगने या संधीचा पूर्ण फायदा घेतला आणि पहिले दोन गुण मिळवले. यानंतर त्याने मोर्तेझाला पलटत त्याचे खांदे जमीनीला लावून चितपट करत सामना संपवला.

बजरंग पुनियाने किर्गिस्तानच्या एर्नाझार अकमातलीवला तांत्रिक गुणांच्या आधारे पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले होते.

हे देखिल वाचा :

भारताचा ऑलिंपिक मधील हॉकीतील तब्बल ४१ वर्षानंतर पदकाचा दुष्काळ संपला,जर्मनीला नमवून कांस्य पदकांवर कब्जा

 

सई हत्तीणीचा मृत्यू मागे “हे” आहे कारण वनविभागाने केले स्पष्ट.. सहाय्यक वनसंरक्षक व त्या पदावरील वरीष्ठ अधिकारी यांच्या मार्फत होणार चौकशी

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.