Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कमलापूर हत्ती कॅम्प मध्ये अडीच वर्षाच्या अर्जुन हत्ती चा मृत्यू.!.

एकाच आठवड्यात लागोपाठ दोन हत्तीच्या मृत्युमुळे वन विभागात उडली खळबळ .मृत्यू चे कारण अस्पष्ठ..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली दि ०६ ऑगस्ट : राज्यात प्रसिद्ध असलेल्या एकमेव शासकीय हत्ती कॅम्प कमलापूर येथे आज आणखी एका हत्तीचा दुपारच्या सुमारास  मृत्यू झाल्याने संपूर्ण वनविभाग तसेच वन्यजीवप्रेमीं मध्ये खळबळ उडाली आहे, आज मृत्यू झालेल्या हत्तीचे नाव “अर्जुन” असून  तो अडीच वर्षाचा होता .त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ठ नसले तरी एकाच आठवड्यात लागोपाठ दोन हत्तीच्या  झालेल्या मृत्यूमुळे हत्ती कॅम्प मधील हत्तीच्या देखभालीसह वनविभागाच्या कार्यप्रनालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

  अवघ्या चार दिवसापुर्वी ३ ऑगस्ट रोजी पहाटे ‘सई’ या तीन वर्षाचा  हत्तीचा मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूचं नेमक कारण  अजूनही अस्प्ष्ठ असतांना मृत्युच्या कारणाची चौकशी सुरु व्हायची असतांनाच आज आणखी एका हत्तीचा मृत्यू झाल्याने एकाच वेळी दोन हत्तीच्या मृत्यूची चौकशी करण्याची नामुष्की सिरोंचा वन विभागावर ओढवली आहे .

आज  मृत्यू झालेल्या हत्तीचे नाव ‘अर्जुन’ असून मंगला या हत्तीणीने १५ जानेवारी २०१९ ला मकर संक्रांतीचा जन्म दिला होता. त्याचे नाव  ‘अर्जुन’असे नाव ठेवण्यात आले होते. केवळ अडीच वर्षाचा ” अर्जुन “ या हत्तीचा मृत्यूचे कारण गुलदस्त्यात आहे. 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

 सिरोंचा वनविभागांतर्गत येत असलेल्या अहेरी तालुक्यातील कमलापूरातील  शासकीय हत्ती कॅम्प मध्ये हत्तीच्या देखभालीकडे दुर्लक्ष  व आरोग्याबाबत हेळसांड होत असल्याचा आरोप  वन्यजीवप्रेमी कडून करण्यात येत आहे.

 ‘आदित्य’ नावाच्या हत्तीचा २९ जून २०२० ला अवघ्या  चवथ्या वर्षी मृत्यू झाला होता. ११ जून २०२० रोजी जवळील तलावातील गाळात आदित्य  फसल्याने  त्याची प्रकृती बिघडली  त्यानंतर वन विभागाने त्याच्यावर उपचार सुरू असतानाच वनकर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे पाईपलाईनचा खड्ड्यात पडल्याने त्याचा मृत्यू झाला होता. त्याचवेळी कमलापूर वनपरिक्षेत्राच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले असले तरी . कुठल्याही कर्मचारी वर कारवाई  झाली नसल्याने दुर्लक्षित करण्यात आल्याची चर्चा जोर धरू लागली आहे .
तर ३ ऑगस्ट रोजी ‘सई’ नावाच्या दोन वर्ष आठ महिने  हत्तीचा मृत्यू झाला.   आणखी आज  एका हत्तीचा मृत्यू झाल्याने आता सिरोंचा वनविभागाच्या  कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे. सिरोंचा वन विभागाचे अधिकारी आतातरी जागे होवून  वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करनर याकडे वन्यजीवप्रेमीनी लक्ष वेधले आहे .

हे देखील वाचा ,

वारे पठ्या!! शाबास ! कुस्तीत भारताचा बजरंग पुनिया उपांत्य फेरीत

वर्षावास आणि गौतम बुद्धांचे जीवन…..

कोरोनामुळे विधवा झालेल्या महिलांच्या पुनर्वसनासाठी राज्यशासन गंभीर!

Comments are closed.