Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वर्षावास आणि गौतम बुद्धांचे जीवन…..

वर्षावास म्हणजे पावसाळ्यातील निवास.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

वर्षावास भगवान गौतम बुध्दांच्या जीवनातील अनेक घटनांशी निगडीत आहे. हा वर्षावास आषाढ पौर्णिमेला सुरू होतो आणि अश्विन पौर्णिमेला संपन्न होतो. बौध्द धम्मात वर्षावासाला अनन्य साधारण महत्व आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

वर्षावास म्हणजे आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या तीन महिने अर्थात निमंत्रित बुद्ध विहारात किंवा गुहेत वास व्यतीत करणे. या काळात विनयात कमीपणा आला असेल त्यांनी ज्येष्ठ भिक्खुंद्वारा पूर्तता करणे, ध्यान – साधना करणे, बौद्ध  धम्म शिकविणे, उपासकांकडून अष्ट पुरस्कारांचे धम्मदान स्वीकारणे व उर्वरीत नऊ महिने धम्म – प्रचार – प्रसाराला घालविणे हे भिक्खुंचे कार्य असते.

र्षावास म्हणजे पावसाळ्यातील निवास.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

तथागत बुद्धांच्या सुचनेनुसार भिक्खुसंघ , धम्म व मानवतेच्या प्रचारासाठी सर्व ऋतूत चारही दिशांना पायी फिरत असत. या तिन्ही ऋतुत ते अनेक नैसर्गिक संकटांचा सामना करून प्रतिकूल परिस्थितीतही ते धम्माचा व मानवतेचा प्रचार-प्रसार करीत असत. त्या काळी खूप पाऊस पडत असे. पावसामुळे पायी फिरणे भिख्खू संघाला शक्य होत नसे. पावसाच्या काळात भिख्खूना भिक्षाटनासाठी जाता येत नसल्याने त्यांची उपासमारही होत असे. एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात असताना नदी नाल्यांना आलेल्या पुरात अनेक भिक्षुकांना आपला जीव देखील गमवावा लागत असे तसेच पावसाळ्यात अनेक आजारांचा भिक्खु संघाला सामना करावा लागत असे.

हे सर्व लक्षात घेऊन तथागत बुद्धांनी भिख्खू संघाला आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या कालावधीत एकाच ठिकाणी विहारात किंवा गुहेत वास करण्याचा सल्ला दिला. येथे वास करत असताना धम्माचा अधिक अभ्यास करीत आसपासच्या परिसरातील उपासकांना धम्म ज्ञान देण्याबाबत सूचना दिल्या.

आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा हा काळ तेव्हापासून वर्षावास म्हणुन संपन्न होऊ लागला. तथागत बुध्दांनी त्यांचा पहिला वर्षावास इ.स.पूर्व ५२७ ला ऋषीपतन सारनाथ येथे व्यतीत केला व इ.स.पूर्वी ४८३ ला शेवटचा ४५ वा वर्षावास केला. बुद्धांनी स्वतः श्रावस्ती, जेतवन, वैशाली, राजगृह या विहारांमध्ये वर्षावास केले.

उपासकांनी पाळावयाची तत्वे.

  • पंचशील १) पाणातिपाता वेरमणी सिक्खापदं समादियामी अर्थ: मी जीव हिंसेपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे.
  • २) अदिन्नदाना वेरमणी सिक्खापदं समादियामी अर्थ : मी चोरी करण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे.
  • ३) कामेसुमिच्छाचारा वेरमणी सिक्खापदं समादियामी’ अर्थ : मी व्याभिचारापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे.
  • ४) मुसावादा वेरमणी सिक्खापदं समादियामी अर्थ : मी खोटे बोलण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे.
  • ५) सुरा-मेरय-मज्ज पमादठ्ठाना वेरमणी सिक्खापदं समादियामी अर्थ : मी मद्य, त्याचप्रमाणे मोहात पडणार्या इत्तर मादक वस्तूच्या सेवनापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे.
  • धम्मचक्रातील आठ आरे हे अष्टांगिक मार्ग दर्शवतात.

    अष्टांगिक मार्ग:

    १) सम्यक् दृष्टी :- निसर्ग नियमाविरुद्ध कोणतीही गोष्ट होऊ शकते ही गोष्ट न मानणे.
    २) सम्यक् संकल्प :- म्हणजे योग्य निर्धार, विचार.
    ३) सम्यक् वाचा :- करुणायुक्त व सत्यपूर्ण वाचा (बोल) ठेवण्याचा प्रयत्न करणे.
    ४) सम्यक् कर्मान्त :- उत्तम कर्म म्हणजे योग्य कृत्ये करणे.
    ५) सम्यक् आजीविका :- वाईट मार्गाने आपली उपजीविका न करता ती सन्मार्गानेच करणे.
    ६) सम्यक् व्यायाम :- वाईट विचार निर्माण झाल्यास त्याचा त्वरित नाश करणे.
    ७) सम्यक् स्मृती :- तात्त्विक गोष्टींचे स्मरण करून चित्तास (मनाला) जागृत ठेवणे.
    ८) सम्यक् समाधी :- कोणत्याही वाईट विकारांना स्पर्श होऊ न देता दुष्ट प्रवृत्तींपासून मन अलग ठेवून चित्त प्रसन्न आणि शांत ठेवणे
  • दहा पारमिता :
    १) शील म्हणजे नीतिमत्ता, वाईट गोष्टी न करण्याकडे असलेला मनाचा कल.
    २)धम्म दान स्वार्थाची किंवा परतफेडीची अपेक्षा न करता दुसर्‍याच्या भल्यासाठी स्वतःची मालमत्ता, रक्त, देह अर्पण करणे.
    ३) उपेक्षा निरपेक्षतेने सतत प्रयत्‍न करीत राहणे.
    ४) नैष्क्रिम्य ऐहिक सुखाचा त्याग करणे.
    ५) वीर्य हाती घेतलेले काम यत्किंचितही माघार न घेता अंगी असलेल्या सर्व सामर्थ्यानिशी पूर्ण करणे.
    ६) शांति म्हणजे क्षमाशीलता, द्वेषाने द्वेषाला उत्तर न देणे.
    ७) सत्य म्हणजे खरे, माणसाने कधीही खोटे बोलता कामा नये.
    ८) अधिष्ठान ध्येय गाठण्याचा दृढ निश्चय.
    ९) करुणा मानवासकट सर्व प्राणिमात्रांविषयी प्रेमपूर्ण दयाशीलता.
    १०) मैत्री म्हणजे सर्व प्राणी, मित्र, शत्रू याविषयीच नव्हे तर सर्व जीवनमात्रांविषयी बंधुभाव बाळगणे.

हे देखील वाचा ,

कोरोनामुळे विधवा झालेल्या महिलांच्या पुनर्वसनासाठी राज्यशासन गंभीर!

लसीकरण मोहिमेसाठी प्रोजेक्ट ,मुंबई संस्थेचे गडचिरोली जिल्हाला सहकार्य

एटापल्ली मध्ये अनाधिकृतपणे सुरु असलेली क्लीनिकल लेबॉरटरीला ठोकले कुलूप

Comments are closed.