Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्ह्यात आज 33 नवीन कोरोना बाधित तर 13 कोरोनामुक्त

Get real time updates directly on you device, subscribe now.

  • बाधितां मध्ये 33 पैकी 31 गडचिरोली तालुक्यातील

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. 28 फेब्रुवारी: आज जिल्हयात 33 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 13 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 9568 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 9344 वर पोहचली. तसेच सद्या 118 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 106 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.66 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 1.23 टक्के तर मृत्यू दर 1.11 टक्के झाला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

नवीन 33 बाधितांमध्ये गडचिरोलीतील तालुक्यातील 31 जणाचा समावेश असून अहेरी तालुक्यातील 1, कुरखेडा तालुक्यातील 1, जणाचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 13 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 9, चामोर्शी तालुक्यातील 2, धानोरा तालुक्यातील 1, तर मुलचेरा तालुक्यातील 1 जणांचा समावेश आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील साईनगर 1, नवेगाव कॉम्पलेक्स 2, कोटगल रोड 5, सीआरपीएफ जवान 1, गोकुलनगर 3, पी डब्ल्यु कॉलनी 1, झेड पी 16, स्थानिक 1, जेल क्वार्टर 1, अहेरी तालुक्यातील सीआरपीएफ जवान 1, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, यांचा समावेश आहे. तर इतर जिल्हयातील बाधिता मध्ये 0 जणांचा समावेश आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.