Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली ब्रेकिंग: कोरपर्शी जंगलात सी-६० जवान आणि माओवाद्यामध्ये मोठी चकमक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. ५ मार्च: महाराष्ट्र आणि छत्तीसगड सीमेवर असलेल्या कोरपर्शी जंगलात सी-६० जवान आणि माओवाद्यामध्ये मोठी चकमक उडाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

      मिळालेल्या माहितीनुसार भामरागड तालूक्यातील कोरपर्शि च्या जंगल परिसरात सी-६० जवान नक्षलविरोधी अभियान राबवीत असतांना माओवाद्यांनी भूसुरुंगाचा स्फोट केला. त्यानंतर दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. हि चकमक छत्तीसगड सीमेवर कालपासून सुरु असल्याने छत्तीसगड पोलीस गडचिरोली पोलिसांच्या मदतीसाठी धावले. दरम्यान गडचिरोली जिल्हा पोलीस मुख्यालयात या बाबीची माहिती मिळताच जिल्हा पोलिसांच्या मदतीसाठी हेलिकॉप्टरने रवाना करण्यात आले आहे. पोलिसांच्या या जंगल परिसरात कोम्बिंग ऑपरेशन सुरु आहे.  

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

        काही दिवसापासून नक्षली कारवायानी डोके वर काढले असे दिसून येत आहे. मात्र चकमकीबाबत पोलीस विभागाकडून कोणतीही अधिकृत माहिती प्राप्त झालेली नाही.

Comments are closed.