Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्ह्यात आज 7 नवीन कोरोना बाधित तर 21 कोरोनामुक्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. 08 मार्च: आज जिल्हयात 7 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 21 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 9699 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 9429 वर पोहचली. तसेच सद्या 162 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 108 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.22 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 1.67 टक्के तर मृत्यू दर 1.11 टक्के झाला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा


नवीन 7 बाधितांमध्ये गडचिरोलीतील तालुक्यातील 6, तर वडसा तालुक्यातील 1, जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 21 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 8, अहेरी 2, आरमोरी 3, चामोर्शी 8, जणांचा समावेश आहे.

नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील नवेगाव 2, मोरेश्वर पेट्रोलपंपच्या मागे 1, स्थानिक 1, साईनगर 1, रामनगर 1, तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये आयटीआय कॉलेज 1, यांचा समावेश आहे. तर इतर जिल्हयातील बाधिता मध्ये 0 जणांचा समावेश आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.