Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्ह्यात आज २६ नवीन कोरोना बाधित तर २९ कोरोनामुक्त

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि.16 मार्च: आज जिल्हयात 26 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 29 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 9932 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 9584 वर पोहचली. तसेच सद्या 240 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 108 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.50 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 2.42 टक्के तर मृत्यू दर 1.09 टक्के झाला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

नवीन 26 बाधितांमध्ये गडचिरोलीतील 12, अहेरी तालुक्यातील 7, आरमोरी तालुक्यातील 1, चामोर्शी तालुक्यातील 1, कुरखेडा तालुक्यातील 2, मूलचेरा तालुक्यातील 1, वडसा तालुक्यातील 2,जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 29 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 24, अहेरी 1, आरमोरी 2, मुलचेरा 1, तर कुरखेडा मधील 1 जणांचा समावेश आहे.

नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील बाधितामध्ये कॅम्प एरिया 2, स्थानिक 2, प्राथमिक आरोग्य केंद्र पोर्ला 1, रेड्डी गोडाऊन चौक 4, गांधी वार्ड 2, पेनगुंडा 1, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये चांदागड 2, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये सुंदर नगर 1, वडसा तालुक्यातील बाधितामध्ये सीआरपीएफ कॅम्प 1, सावंगी 1, चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये आष्टी 1, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1,अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये नागेपल्ली 3, संत मानव दयाल आश्रम शाळा 4 जणांचा समावेश आहे. तर इतर जिल्हयातील बाधितामध्ये 0 जणांचा समावेश आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.