Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सांगली जिल्ह्यामध्ये लवकराच शेतीमालाच्या रेसिड्यूवर संशोधन करणारे अद्यावत केंद्र उभारले जाणार – कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

सांगली, दि. १७ मार्च: सांगली जिल्ह्यामध्ये लवकराच शेतीमालाच्या रेसिड्यूवर संशोधन करणारे अद्यावत केंद्र उभारले जाणार,
असल्याची घोषणा कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी केली आहे.तसेच कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी जनतेने नियमांचे कडक पालन करावे, असे आवाहन सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी केले आहे. सांगली मध्ये आयोजित कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते.

सांगली जिल्ह्यातील कोरोना स्थितीच्या पार्श्‍वभूमीवर कृषी व सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या अध्यक्षतेखाली सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक पार पडली.यावेळी आमदार विक्रम सावंत, जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी,जिल्हा पोलीस अधिक्षक दीक्षित गेडाम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी व अधिकारी उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या बैठकीत बोलताना मंत्री विश्वजीत कदम यांनी जिल्ह्यामध्ये कोरोना लसीकरण सुरू असून आतापर्यंत एकूण ६४ हजार २८० जणांनी पहिला डोस तर १२ हजार ४४२ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. जिल्ह्यातील लसीकरणाचे हे प्रमाण राज्यात पहिल्या पाच क्रमांकामध्ये आहे. तर गेल्या काही दिवसात जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत असून हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासकीय यंत्रणांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडकपणे अंमलबजावणी करावी, अश्या सूचना देत जनतेनेही या नियमांचं पालन करावे, असे आवाहन कदम यांनी यावेळी केलं, तसेच सांगली जिल्ह्यामध्ये डाळींब, द्राक्ष यासह इतर फळपिकांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते, त्यामुळे लवकरच शेतीमालाच्या रेसिड्यूवर संशोधन करणारे अद्यावत केंद्र उभारले जाणार, असल्याची घोषणाही, यावेळी मंत्री कदम यांनी केली आहे. त्याचबरोबर मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांच्या कामगिरीवर कोणी शंका घेण्याचे कारण नाही, त्यांचे काम हे नेहमीच चांगलं राहिले आहे, जागतिक पातळीवर कौतुक झालेला आहे. असे स्पष्ट करत राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे स्थिर असून पाच वर्ष टिकेल असा विश्वजीत कदम यांनी व्यक्त केला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.